आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकाल धावपळीच्या जीवनामुळे पौष्टिक अन्नाचे सेवन आपण करतोच असे नाही. बाहेरील फास्ट फूड खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे पोटात गॅसचा त्रास निर्माण होतो. यासाठी आपण अनेक औषधांचा सेवन करतो पण याचा काही चांगला फायदा जाणवत नाही. यासाठी जाणून घेऊ काही घरगुती उपाय
हिंग
कोमट पाण्यात आर्धा चमचा हिंग मिसळून सेवन केल्याने गॅसचा त्रास कमी होतो. हिंग अँटीफ्लैटुलेंटचे काम करते यामुळे पोटात गॅस तयार करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करते.
ओवा
गरम पाण्यात एक चमचा ओवा मिसळून रोज घ्या. ओव्यामध्ये थिमोल नावाच्या घटकामुळे पोटातील गॅस दूर करण्यात मदत करते.
दालचीनी
दालचीनी पोटात होणाऱ्या गॅसवर खूप फायदेमंद असते. एक कप गरम दुधात दालचिनी पावडर आणि मध मिसळून सेवन केल्याने पोटात गॅस कमी करण्यास खूप मदत होते.
बेकिंग सोडा आणि लिंबू
सोडियम बाइकार्बोनेटलाच बेकिंग सोडा म्हणातात आणि बेकिंग सोडा त्वरित पोटातील गॅस कमी करण्यात खूप मदत करते. बेकिंग सोड्यात लिंबू मिसळून पिल्याने खूप चांगला फायदा होतो. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये आर्धा लिंबू मिसळून पिल्याने पोटातील गॅस लवकर कमी होतो आणि पोटदुखीही कमी होते.
ॲपल साइडर व्हिनेगार
शरीरातील क्षार कमी करण्यासाठी ॲपल साइडर व्हिनेगार उपयुक्त असते. यामध्ये असणाऱ्या एंजाइम शरीरासाठी फायदेमंद असतात. अपचन आणि पोटातील गॅस कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. दोन चमचा ॲपल साइडर व्हिनेगार गरम पाण्यात मिसळा आणि थंड झाल्यानंतर दिवसातून दोनदा याचे सेवन करा. यामुळे पोटातील गॅस कमी करण्यात मदत होते.