आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग आल्यास महिलांना खूपच टेन्शन येते. महिला सुंदर दिसण्यासाठी नेहमी ब्यूटी ट्रीटमेंट घेत असतात. परंतु, तारूण्यात प्रवेश करताच अनेक तरूणींचा चेहरा तारूण्य पिटीकांनी भरून जातो. योग्य उपचार घेतल्यास हा त्रास घालवता येऊ शकतो. मात्र, तारूण्य पिटीका गेल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग अनेकदा तसेच राहतात. या काळ्या डागांपासून सुटका होण्यासाठी काही घरगुती उपाय रामबाण ठरतात.
टोमॅटोचा रस आणि लिंबाच्या रस एकत्र करून बाटली फ्रिजमध्ये ठेवावी. हा रस नियमित चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग हळूहळू निघून जातात. तसेच कोरडी हळद लिंबाच्या रसासोबत एकत्रकरून चेहऱ्यास लावल्यास डाग जातात. लिंबू, संत्राचे साल वाळवून त्याची पाउडर तयार करावी. गुलाब पाण्यात अथवा दह्यात एकत्रित करून डाग असलेल्या ठिकाणी हा लेप लावल्यास चांगला परिणाम दिसून येतो. तेलकट चेहर्यावरील डाग़ जाण्याकरता चंदनाची पाउडर गुलाब पाण्यात एकत्र करून लाववी. हा उपाय विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फायद्याचा ठरू शकतो.