सुंदर आणि लांबसडक केसासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय
पुणे : शलाका धर्माधिकारी – केसांचे आरोग्य हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. केसांची योग्य वाढ होण्यासाठी आज बाजारात वेगवेगळी औषधी, तेल आणि हेअरपॅक देखील उपलब्ध आहेत . त्यापैकी कोणते तेल आपल्याला सूट करते हे माहिती घेऊन त्याचा वापर करणे योग्य ठरते. परंतु, सध्याच्या बाजारात मिळणाऱ्या विविध केमिकलयुक्त प्रॉडक्टसमुळे केसांचे आरोग्य खूप धोक्यात आले आहे. आणि केस हे तर मुलींचे खरे सौंदर्य असते. त्यामुळे मुलींना केसाचे आरोग्य राखणे खूप महत्वाचे असते. अगदी पाण्यात जरी बदल झाला तर केस गळती आणि कोंड्याची समस्या निर्माण होते. खाली दिलेल्या या घरगुती उपायाने तुमचे केस एका महिन्यातच वाढीस लागतील.
लवकर केस वाढण्यासाठी आणि सुंदर होण्यासाठी एक कांदा घ्या. त्यात पांढरा कांदा मिळाला तर अधिक उत्तम. हा कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हा बारीक वाटलेला कांदा गाळणीतून गाळून घ्या. नंतर कांद्याचा चोथा बाजूला काढून उर्वरित कांद्याचा रस केसांना लावा.
हा कांद्याचा रस कमीत कमी ३ तास केसांना लावून ठेवा. रात्री झोपताना लावून सकाळी केस धुतले तरीही चालेल. परंतु, कांद्याच्या वासाने सर्दी होण्याची किंवा डोळ्यात पाणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना कांदा लावल्यानंतर ३ तासांनी केस धुतले तरी चालतील.