आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जेवणानंतर पोटात गॅस होण्याची समस्या अनेक व्यक्तींना असते. यामुळे अस्वस्थता वाढते. ही समस्या जाणवत असल्यास वेळीच उपाय केले पाहिजेत. यासाठी आहारात या ५ गोष्टी टाळाव्यात.
तर हे टाळले पाहिजे
पत्ताकोबी
यातील कार्बोहायड्रेट्समुळे गॅस अधिक प्रमाणात होतो. याऐवजी काकडी खा.
लसून
यामुळे सुद्धा पोटात गॅस होऊ शकतो. त्याऐवजी अद्रकचा वापर करा.
कांदा
हा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात गॅस होतो. कांद्याऐवजी पुदीना वापरा.
गहू
यातील कार्बोहायड्रेट्समुळे पोटात गॅस होतो. याऐवजी ज्वारी किंवा ओट्सचा वापर करा.
थंड पेय
यामुळे पोटात गॅस होतो. त्याऐवजी ताज्या फळांचा ज्यूस घ्या.