बेबी मसाज
हलक्या हातांनी बाळाची मसाज केल्याने बाळाचे ब्लड फ्लो वाढवण्यात मदत होते. यामुळे ब्रेनची कॅपॅसिटी वाढते आणि काम करण्याची क्षमता सुधारते.
ऊन घ्या
सूर्य किरणांमुळे बाळाच्या हाडांना व्हिटॅमिन डी मिळते. परंतु, फक्त २० मिनिटे उन्हात बसा.
चवीत बदल करा
आई जे पदार्थ खाते त्यांची चव पोटातील बाळालाही मिळते. पोटातील बाळाचे टेस्ट बड १२ व्या आठवड्यापासूनच विकसित होतात. यासाठी विविध पदार्थ खाऊन बाळाला त्याची चव देऊ शकता.
बाळासोबत बोला
विश्वास बसणार नाही, पण बाळ आईचा आवाज ऐकू शकते. बाळासोबत मनातल्या मनात बोलू शकता. बाळासोबत बोलल्याने बाळाची ब्रेन पावर वाढते. विचार करण्याची क्षमता विकसित होते.
रोज व्यायाम करा
गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज व्यायाम करावा. गरोदर महिलांनी व्यायाम केल्याने बाळ आनंदी राहते. यामुळे त्यांच्या ब्रेनपर्यंत ब्लड फ्लो चांगल्या प्रकारे होतो.
संगित ऐका
जे संगित तुम्हाला आनंद आणि मानसिक समाधान देते ते संगित बाळासाठी चांगले समजले जाते.