आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सिक्स पॅक्स अॅब्सची बॉडी हवी, असे प्रत्येक तरूणाला वाटते. परंतु, अशी बॉडी कमावण्यासाठी खुप घाम गाळावा लागतो. महागडा डाएट घ्यावा लागतो. मात्र, काही सोपे उपाय केल्यास सिक्स पॅक्स अॅब्स बनवणे सोपे आहे. लठ्ठपणा कमी करून सिक्स पॅक बनविण्याची इच्छा असणारांनी हे सोपे व्यायाम प्रकार केल्यास फायदा होऊ शकतो.
हे व्यायाम करा
१) हील क्रंच
पाठीवर झोपा. पाय जवळ घ्या. पायांचे तळवे जमिनीला स्पर्शून ठेवा. दोन्ही हातांना क्रॉस करुन डोक्याखाली घ्या. शरीराचा खालचा भाग टाचांवर ठेवा. पंजे वर उचला. शरीराचा वरचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा. असे बारा ते सोळा वेळा करा.
२) प्लॅँक एक्झरसाइज
पोटाच्या बाजूने चटईवर झोपा. डोक्याचा जमिनीला स्पर्श करा. शरीराचा वरचा भाग कोपऱ्यांवर घेऊन कोपरे जमिनीवर टेकून पायांनाही पंज्यांवर टेकवा. पोट व मांड्यांना वर उचलण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत वीस ते तीस सेकंदपर्यंत थांबा. नंतर साधारण स्थितीत या. असे दोन ते तीन वेळा करा.
३) सायकलिंग
अॅब्स बनविण्यासाठी सायकलिंग करा. सायकल नसल्यास विना सायकलही सायकलिंगच्या मूव्हमेंट करता येतात.
४) व्हर्टिकल लेग क्रंच
चटईवर पाठीच्या बाजूने झोपा. पाय वर उचला. ९० डिग्रीचा कोन तयार करा. डोक्याला हातांच्या साह्याने आधार द्या. छातीने पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा मुळ स्थितीत या.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)