आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्या सोयीसाठी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी अथवा हौस म्हणून काही वस्तू आपण घरात वापरत असतो. परंतु, याच वस्तू आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अशा गोष्टींपासून नेहमीच चार हात दूर राहिले पाहिजे. अथवा त्यांचा वापर टाळला पाहिजे. या चार गोष्टीं कोणत्या आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१) विषारी रोपे
काही लोकांना घरात हिरवी अथवा रंगीत रोपे लावण्याची आवड असते. परंतु, काही रोपे ही कार्बन डाय ऑक्साइड सोडतात. याचा आरोग्यावर परिणाम होतो. तर काही रोपे ही खुपच विषारी असतात. डंब केन हे असेच एक सुंदर हाऊसप्लांट आहे जे एका मिनिटात कोणाचाही जीव घेऊ शकते. या रोपाचा प्रत्येक भाग विषारी असतो.
२) मच्छर कॉइल, लिक्विड
डासांना पळवून लावण्यासाठी अनेकजण घरात मच्छर कॉइल अथवा लिक्विडचा वापर करतात. याचा धुर व गंध विषारी असतो. यामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साइडसह काही घातक रसायनांचे प्रमाण वाढते. याचा परिणाम आरोग्यावर होतो.
३) एसी
एअर कंडिशनरमधून हवा विषारी असते, ती पर्यावरणाला प्रदूषित करते.
४) अगरबत्ती
सकाळ-संध्याकळा देवाची पूजा करताना काहीजण अगरबत्ती वापरतात. परंतु, यामध्ये केमिकल वापरले जात असल्याने हवा प्रदुषित होते. शिवाय आरोग्याला धोका सुद्धा निर्माण होतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)