आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अधिक काळ पदार्थ टिकावेत यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवले जातात. ताजी फळ, पालेभाज्यापासून ते शिल्लक राहिलेले अन्न सर्रासपणे फ्रिजमध्ये ठेवले जाते. मात्र प्रत्येक पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही कारण त्यांची पौष्टिक मात्रा तर कमी होतेच शिवाय ते शरीरासाठीही चांगले नसते. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेवता कामा नये.
लसूण
लसूण हा एक गरम पदार्थ म्हणून ओळखले जातो. लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा गरमपणा कमी होतो आणि त्यातील शरीरासाठी उत्तम असणारे घटकही नष्ट होतात.
ड्रायफ्रूट्स
अनेक लोक ड्रायफ्रूट्स खराब होऊ नयेत म्हणून फ्रिजमध्ये ठेवतात. पण फ्रिजच्या थंड हवेने ड्रायफ्रूट्समधील पोषक तत्वे कमी होण्याची शक्यता असते. म्हणून ड्रायफ्रूट्स फ्रिजमध्ये ठेवणे टाळावेत.
केळी
केळीला पिकण्यासाठी गरम तापमानाची गरज असते. जर आपण केळी फ्रिज मध्ये ठेवला तर त्याच्या पिकण्यास अडथळा होऊ शकतो. म्हणून केळी कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नये.
मध
मधातील नैसर्गिक गुणधर्म राखण्यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवता कामा नये. कारण रूम टेम्परेचर मध्ये मध ठेवल्याने त्यात असणारे गुणधर्म आणि त्याच्या चवीत काहीच बदल होत नाही. यासाठी मध फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी बाहेरच ठेवणे योग्य असते.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल फ्रिजमध्ये ठेवल्याने ते गोठण्याची शक्यता असते. यामुळे ऑलिव्ह ऑईल खराब होऊ शकतो . म्हणून चुकूनही ऑलिव्ह ऑईल फ्रिजमध्ये ठेवू नये.