सावधान ! नखांचा बदललेला रंग देतो कॅन्सरची सूचना
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नखांचा संबंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आरोग्याशीही आहे. नखांचे आरोग्य हे व्यक्तीच्या आरोग्याचा आरसा असते. नखांचा रंग बदलला असेल किंवा ती पुन्हा पुन्हा तुटत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. कारण नखाचा बदललेला रंग एखाद्या मोठ्या आजाराची पूर्वसूचना देत असतो.
नखांवर काळा रंग असेल तर कॅन्सर असण्याची शक्यता असते म्हणून जर तुमच्या नखांचा रंग बदलला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.खूपच कमी लोकांना माहित आहे की नखात सुध्दा त्वचेच्या कॅन्सरची लक्षणे दिसू शकतात. कॅल्शियम किंवा मिनरल्सची कमी असल्यामुळे किंवा नखावर लागल्यामुळे नखांचा रंग बदलला आहे असे अनेकांना वाटते. मात्र कधी कधी नखांवर काळा डाग असेल, तर हे त्वचेच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात.
मात्र दिसणारी ही सर्वच लक्षणं कॅन्सरची असतीलच असे नाही. नखांच्या इतरही गोष्टींवरून समजू शकते कॅन्सर आहे की नाही. जर नखे कमकूवत होऊन लगेच तुटत असतील , नखांजवळ रक्तस्त्राव होत असेल किंवा नखांवर काळ्या डागांसोबतच नखांच्या आजूबाजूचा रंग बदलला असेल तर ही लक्षणे त्वचेच्या कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.