आरोग्यानामा ऑनलाईन टीम : काही महिला शारीरिक तक्रारींना क्षुल्लक समजून दुर्लक्ष करतात. परंतु, असे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. यामुळे छोटी समस्यानंतर मोठी होऊ शकते. अशी समस्या खुप दिवस जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करावी. या समस्या कोणत्या ते जाणून घेवूयात.
हे आहेत धोके
1 खोकला येणे
एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला टिकून राहिला तर हे टीबी सारख्या गंभीर आजाराचे लक्षण असण्याची शक्यता आहे.
2 छातीत दुखणे
सतत छातीमध्ये दुखत असेल किंवा जळजळ होत असेल तर ही कॅन्सर, थायरॉइड, पोटाच्या समस्या आणि अल्सर सारख्या आजारांची लक्षणे असू शकतात.
3 अंगदुखी
शरीराच्या कोणताही भाग 3 दिवसांपेक्षा जास्त दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका. हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
4 वजन कमी होणे
दर आठवड्याला 2-3 किलोग्रॅम वजन कमी होणे कॅन्सर, थायरॉइड यांसारख्या गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणे असण्याची शक्यता आहे.
5 थकवा येणे
थकवा आठवड्यापेक्षा जास्त काळ जाणवत असेल तर मात्र दुर्लक्ष करू नका. हा कोणत्याही मोठ्या आजारांचा संकेत असू शकतो.
Visit : arogyanama.com