आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चायनीज फूड खाण्याचे प्रमाण सध्या खुपच वाढले आहे. परंतु, हे अतिप्रमाणात खाणे आरोग्यास हानीकारक आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी तर हे खुपच धोकादायक आहे. यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने या रूग्णांना त्रास होऊ शकतो. तसेच हे पदार्थ अपचन, लठ्ठपणा, मधुमेहासारख्या समस्या निर्माण करू शकतात. चायनीज फूड कोणी खावू नये, खात असल्यास कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती घेवूयात.
हे लक्षात ठेवा
या डिश निवडा
ज्या चायनिज डिशमध्ये जास्त पाालेभाज्यांचा वापर केला जातो, अशा चाचनीज डिश खाण्यासाठी निवडा.
मांसाहार टाळा
या डिश डीप फ्राय केल्या जातात. तसेच यामध्ये सॉसची मेरिनेटिंग असल्याने वजन वाढणे, लठ्ठपणा, रक्तदाब या समस्या वाढू शकतात.
हे खावू शकता
काही चायनिज डिशेज वाफेवर तयार केल्या जातात. मोमोजसारख्या या डिशेसमध्ये कमी कॅलरी असतात. हे खावू शकता.
मर्यादित खा
चायनीज डिशेसमध्ये फॅट आणि कॅलरी अधिक असल्याने वजन वाढू शकते. यामुळे हे मर्यादितच खा.
एपोटायजर्स, सूप घ्या
चायनीज फूड खाण्यापूर्वी सूप आणि एपोटायजर्स घेतल्याने हेवी फूड कमी सेवन केले जाते.
सॉस कमी घ्या
चायनीज सोया सॉस, होयसिन इत्यादी सॉसमध्ये मीठ आणि साखर जास्त असल्याने त्याचा वापर कमी करा.
दर्जा पहा
रस्त्यावरील चायनीज फूडमध्ये हलक्या दर्जाचे सॉस आणि इतर पदार्थ वापरले जात असल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. असे पदार्थ टाळा.
एमएसजी कमी वापरा
चायनीज फूडमध्ये वापरले जाणारे सोडियम ग्लुटामेट किंवा एमएसजी ज्यास अजिनोमोटो म्हटले जाते, ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. यामुळेचायनीज फूड जास्त खाऊ नका.
रक्तदाबाच्या रूग्णांसाठी घातक
चायनीज फूडमध्ये भारतीय पदार्थांच्या तुलनेत यात ४० टक्के जास्त सोडियम असल्याने रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते हानिकारक ठरू शकते.
कार्बोहायड्रेट्स
मैद्याचे नूडल्स आणि तांदुळ जास्त वापरले जाते. हे हाय कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ असल्याने अपचन, लठ्ठपणा, मधुमेहासारख्या समस्या होऊ शकतात.