आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोकेदुखी ही एक किरकोळ आणि सामान्य शारीरीक समस्या आहे. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास गोळी घेणे, बाम लावणे असे उपाय नेहमीच केले जातात. परंतु, ही समस्या कधी-कधी हानिकारकही ठरू शकते. सतत डोकदुखी होत असेल, औषधाचा परिणाम होत नसेल तर यामागे गंभीर कारण असू शकते. ब्रेन ट्यूमर किंवा मायग्रेनचे हे लक्षणे असू शकते. याबाबत अधिक जाणून घेवूयात.
ही आहेत डोकेदुखीची कारणे
- १ सुमारे आठवडाभर डोक्याच्या चारही बाजून दाब जाणवत असल्यास हे ताणतणावामुळे होऊ शकते. चिंता आणि तणाव या समस्येचे मुख्य कारण आहे. तसेच चेहऱ्याच्या मांसपेशींमध्ये समस्या असल्यास असे होऊ शकते.
- डोके, नाक आणि चीकबोन्समध्ये सतत दुखत असल्यास हे सायनस डोकेदुखीचे लक्षण असू शकते. यामुळे ताप येतो, चेहरा सूजतो.
- सतत थकवा, एखादा अवयव सतत दुखणे, यावर पेनकिलर घेऊन झोपून जाणे, हे हानिकारक ठरू शकते.
- शरीराचा तोल सांभाळता येत नसेल तर हे गंभीर लक्षण आहे. हे लक्षण दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. कारण हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण आहे. स्मृतिभ्रंश होणे, झटके येणे हे सुद्धा याच आजाराचे लक्षण आहे.
- औषध घेवूनही डोकेदुखी थांबत नसल्यास मायग्रेनचा त्रास असू शकतो. या दुखण्यात डोक्याचा अर्धाभाग दुखतो. मळमळ होते. प्रकाश आणि गोंधळाने त्रास होतो.
- डोळ्यांच्या चारही बाजूने किंवा वरच्या बाजूला जास्त दुखत असल्यास हे क्लसटर डोकेदुखीचे लक्षण आहे. याचे परिणाम भयंकर असतात. यात डोळे लाल होणे, डोळ्यातून, नाकातून पाणी गळणे असा त्रास होतो.