आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकांना काही काम करताना किंवा अचानक काही तरी इजा होते. तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर त्या आजारावर प्राथमिक उपचार घेतो. जेणेकरून हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत आपल्या वेदना कमी होतील. आणि आपल्याला आराम मिळेल. पण हे प्राथमिक उपचार घेताना आपण नकळत काही चुका करतो. ज्यामुळे रुग्णाला नुकसान पोहचू शकते.
१) अनेक लोक भाजलेल्या जागेवर बर्फ लावतात. पण असे करणे खूप चुकीचे आहे. कारण असे केल्यामुळे तुम्हाला फ्रॉस्ट बाइट होण्याचा मोठा धोका असतो. पण हे आपल्या लक्षात येत नाही.
२) भाजलेल्या जागेवर बर्फ लावल्याने आपल्या त्वचेला नुकसान पोहचण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे थोडे जरी भाजले असेल तर त्या जागेवर बर्फ कधीच लावू नका. कारण यामुळे आपल्या त्वचेला भारी नुकसान होते.
३) काहीजण भाजल्यावर त्या ठिकाणी दही किंवा टूथपेस्ट लावतात. पण या पासूनही लांब राहा.
४) भाजलेल्या ठिकाणी बर्फ लावण्यापेक्षा थंड पाणी टाका. आणि ती जागा एका चांगल्या सुक्या कपड्याने पुसून घ्या. यामुळे तुमच्या त्वचेला आराम तर मिळेलच पण काही नुकसान होणार नाही. कारण भाजलेल्या ठिकाणी पाणी टाकल. तर शरीरातील उष्णता बाहेर पडायला मदत होईल. आणि त्या ठिकाणची सूजही कमी होते.
५) महत्वाचे म्हणजे भाजलेल्या ठिकाणी कापूस लावण्यापेक्षा बॅंडेज गॉज लावा. कारण हे तुमच्या त्वचेला चिटकू शकत नाही.