ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकजण ऑफिसला सकाळी लवकर जातात आणि रात्री उशीरापर्यंत काम करतात. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी वेळच मिळत नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे. व्यायाम न केल्यास लठ्ठपणा, मधुमेह, रक्दाब असे आजार सहजपणे होऊ शकतात. जर व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही ऑफिसमध्येही पाच-दहा मिनिटे वेळ काढून व्यायाम करू शकता, असेही काही व्यायामाचे प्रकार आहेत.
ऑफिसमध्ये करता येण्यासारखे कोणते व्यायाम आहेत, याची महिती घेवूयात. आठवड्यातून तीन दिवस फक्त १० ते १५ मिनिटे व्यायाम केला तरी आरोग्य चांगले राहू शकते. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे गरजेचे आहे. ज्या प्रकारे पुश-अप्स केले जातात तसेच उभ्यानेच दोन्ही हातांची हालचाल करावी. हातांवरच जोर देत पुढे-मागे करायचे. १० वेळा हा व्यायाम प्रकार करावा. ट्रायसेप्स हा व्यायाम प्रकारही ऑफिसमध्ये करता येतो. यासाठी खुर्चीवर मागच्या बाजूने वाकून बसा आणि हातात बाटल्या पकडा. बाटल्या पुढे, मागे, वर, खाली कराव्यात. दोनवेळा असे केल्यानंतर पुन्हा मुळ स्थितीत यावे.
डिप्स हा व्यायाम प्रकारही खुर्चीवर बसून करता येतो. यासाठी खुर्चीवर बसून संपूर्ण शरीर खाली-वर करावे. असे दोनवेळा करावे. तसेच बायसेप्स कर्ल हा व्यायाम करताना डंबेल्सची गरज पडत नाही. पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या हातात घ्याव्यात. व्यायामास सुरुवात करावी. प्रथम एक हात वर आणि दुसरा खाली करावा. अथवा पुन्हा दोन्ही हात एकाचवेळी वर-खाली आणि खाली-वर करावेत. दोनदा ही क्रिया केल्यानंतर दुसरा व्यायाम सुरू करावा. लॅटरल हा व्यायाम प्रकार करण्यासाठी डंबेलऐवजी बाटलीद्वारे व्यायाम करावा. दोन्ही बाटल्या घेऊन हात पुढे वर उचलावेत. नंतर वेगवेगळ्या दिशेने दोन्ही हात उघडून पसरवेत. थोडावेळ असेच थांबावे. आणि पुन्हा मुळ स्थितीत यावे. हा व्यायाम प्रकार दोन वेळा करावा.