आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पायांचे सौंदर्य वाढविण्यासाठी मुली पार्लरमध्ये भरपूर पैसे खर्च करतात. परंतु, आपण घरी पेडीक्योरद्वारे सुंदर पाय मिळवू शकता. चॉकलेट पेडीक्योर कसे करावे हे जाणून घ्या. ३० मिनिटांचे चॉकलेट पेडीक्योर आपले पाय स्वच्छ साफ करेल.
पेडीक्योर का महत्त्वाचे आहे ?
शरीराच्या उर्वरित भागाप्रमाणे काम करताना पाय देखील थकतात. थकवा दूर करण्यासाठी आणि पायांची घाण साफ करण्यासाठी पेडीक्योर करणे खूप महत्त्वाचे आहे. पेडीक्योर देखील पायांना पोषण प्रदान करते.
व्हेजिटेरियन लोकांमध्ये होऊ शकते प्रोटीन्सची कमतरता, ‘या’ 6 गोष्टींचे सेवन सुरू करा, जाणून घ्या
साहित्य
१) वितळवलेलं चॉकलेट- ४ कप
२) दूध- २ कप
३) मध-३ कप
४) एका टबमध्ये गरम पाणी
५) फूट स्क्रब
६) नेल फायलर
७) नेल स्क्रब
८) नेल कटर
९) नेल पेंट
१०) नेल पेंट रिमूव्हर
११) मॉइश्चरायझर
१२) टॉवेल
न्यूट्रिशनची पावर हाऊस आहे ‘ही’ एक ‘गंमत’, उन्हाळ्यात खाल्ल्याने आरोग्याला होतील 8 फायदे, जाणून घ्या
पेडीक्योर करण्याची पद्धत
१) चॉकलेट पेडीक्योर करण्यासाठी नखांवर लावलेली नेट पेंट काढून घ्या.
२) आता एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या.पाण्यामध्ये १० ते १५ मिनिटांसाठी पाय सोडून बसा.
३) त्यानंतर वितळलेल्या चॉकलेटमध्ये दूध टाकून मिश्रण तयार करा. आता या मिश्रणामध्ये पाय टाकून ठेवा.आणि २० मिनिटांपर्यंत ठेवा. त्यानंतर पाय धुवून घ्या.
४) पाय धुतल्यानंतर स्क्रब करा. स्क्रब केल्याने त्वचेवर मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते.
५) यासाठी घरीच चॉकलेट स्क्रब तयार करू शकता. ५ ते १० मिनिटे पायांना स्क्रब करा. स्क्रब केल्यानंतर पायांना थंड पाण्याने स्वच्छ करून घ्या.
६) सर्वात शेवटी मॉयश्चरायझर लावून २ मिनिटांपर्यंत मालिश करा. त्यानंतर नखांवर तुमच्या आवडीची एखादी नेलपेंट लावा.
चॉकलेट पेडीक्योरचे फायदे
चॉकलेट पेडीक्योर पाय सुंदर बनवण्याबरोबरच त्वचेला हायड्रेट ठेवण्यास, मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करते. हे पायामध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते.
Improve Power : ‘काम’शक्ती म्हणजेच ‘संभोग’शक्ती वाढवतील ‘हे’ 10 फूड, आजच करा ट्राय…
बदलत्या हवामानात इम्यून सिस्टम मजबूत ठेवण्यासाठी रोज प्या ‘हे’ स्पेशल ड्रिंक
कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टीचे करा नियमित सेवन, जाणून घ्या
ओबेसिटी आणि डायबिटीजसह गोड पदार्थांचे सेवन खराब करू शकते तुमची ‘इम्यून सिस्टम’ सुद्धा