आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास चांगली झोप आवश्यक असते. अन्यथा विविध गंभीर आजार होऊ शकतात. धावपळीच्या जीवनामुळे सध्या अनेकांच्या झोपेवर परिणाम झाला आहे. परंतु, झोप पूर्ण न घेणे चांगलेच महागात पडू शकते. यामुळे कर्करोग, मधुमेह तसेच हृदयासंबंधीचे आजार होऊ शकतात. यासंदर्भात स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या स्ट्रेस रिसर्च इन्स्टीट्यूटने केलेल्या अभ्यासानंतर काही निष्कर्ष मांडले आहेत.
संशोधकांचे निष्कर्ष
१. पासष्ठ वर्षांपेक्षा कमी वयांचे जे लोक वीकेंडला पाच तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांच्या मृत्यूचा दर जे विकेंडला सहा-सात तास झोप घेतात यांच्यापेक्षा बावन्न टक्के अधिक होता.
२. यासोबतच या वयोगटातील जे लोक आठवड्यातून कमी झोप घेत होते आणि विकेंडला जास्त, त्यांच्या मृत्यूचा दर त्यांच्या बरोबरीत होता जे लोक रात्री सहा-सात तास झोप घेतात.
३. रोज आठ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने मृत्यू दर वाढू शकतो. संशोधकांनी ६५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांचा संशोधनासाठी अभ्यास केला.