आरोग्यनामा ऑनलाईन – प्लास्टिक बाटल्यांमधील पाणी पिणे, प्लॅस्टिक कंटेनरमध्ये गरम अन्नपदार्थ ठेवणे, यामुळे शरीरावर अतिशय घातक परिणाम होत असतात. प्लास्टिक रसायनांमुळे कॅन्सर, डायबेटीस, एडीएचडी आणि ऑटिज्म सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. प्लास्टिकमधील घातक रसायने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात. यामुळे हे आजार होण्याचा धोका वाढतो. शिवाय, यामुळे वजन वाढू शकते. हे धोके टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती घेवूयात.
ही काळजी घ्या
१ प्लास्टिकच्या भांड्यातील पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नका.
२ डिशवॉशरमध्ये प्लास्टिकची भांडी धुऊ नका. प्लास्टिक भांडी धुण्यासाठी कठीण डिटर्जेंटचा वापर करू नका.
३ मुलांसाठी प्लास्टिकऐवजी लाकडाच्या खेळण्या आणा.
४ खाण्याच्या पॅकिंगला बीपीए-फ्री लेबल असेल तरच ते स्वीकारा.
५ खाण्याचे पदार्थ हे काचेच्या भांड्यात ठेवा.
६ प्लास्टिकच्या भांड्यामध्ये अन्नपदार्थ कधीही ठेवू नये. गरम पदार्थ प्लास्टिकच्या भांड्यात ठेवणे आणखी घातक आहे.
७ ताजे, फ्रोजन किंवा सुकलेल्या पदार्थांचाच वापर करावा. कॅनमध्ये ठेवलेले फ्रोजन वापरू नये.
८ नवजात बाळाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजण्यापेक्षा थेट आईचेच दूध पाजावे. शक्य नसल्यास काचेच्या भांड्याचा वापर करा.
- आरोग्यविषयक वृत्त –
- त्वचा काळवंडली आहे ? करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, झटपट दिसेल बदल
- रोज खा केवळ २ अक्रोड, फायदे ऐकूण व्हाल आश्चर्यचकित
- सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या
- कानाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत
- मूड चांगला होणे ‘हे’ तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव
- मक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे ‘हे’ ६ आजार होतील बरे, असे तयार करा
- ‘हा’ फोटो पाहून अस्वस्थ झालात का ? तर तुम्हालाही असू शकतो ‘हा’ आजार
- ‘या’ ९ पद्धतींनी कधीही खाऊ नका दही, फायद्याऐवजी होईल नुकसान