आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तोंडाचा अल्सर हा एक त्रासदायक आजार आहे. याने बोलता येत नाही, काही खाता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही. याच्या वेदनाही खूप असह्य असतात. हा आजार जर जास्त वाढला. तर याला बरा व्हायला ही जास्त वेळ लागतो. हा आजार लवकर नियंत्रणात आणण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.
१) अल्सर झालेल्या भागाला संसर्ग होऊ नये म्हणून मीठाच्या पाण्याने चूळ भरा.जेणेकरून तोंडाच्या उर्वरित भागला अल्सर होणार नाही.
२) तोंडाच्या अल्सरमुळे जर खूपच वेदना होत असतील, तर बर्फाचा लहानसा गोळा घेऊन, त्याजागी फिरवा आणि थंड पाण्याने चूळ भरा.
३) तोंडचा अल्सर झाल्यावर तुळशीची पाने खावीत कारण तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळसीच्या पानांमुळे ताण कमी करण्यास मदत होते.
४) तोंड आल्यावर सुके खोबरे खावे. तसेच खोबर्याचे तेल, नारळाचे पाणी हे तीनही घटक माऊथ अल्सरपासून आराम मिळवण्यास मदत करतात.
५) खसखसीच्या बिया ठेचुन त्यात साखर टाकून खा. यामुळे अल्सरपासून आराम मिळवण्यासाठी मदत होईल.