आरोग्यानामा ऑनलाइन टीम – रक्तदान करण्याची अनेक लोकांची इच्छा असते. परंतु, काही गैरसमजामुळे असे लोक रक्तदान करण्यास पुढे येत नाहीत. खरे तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यापासून कोणताही धोका नसल्याने सर्वांनीच ते केले पाहिजे. याबाबत कोणते गैरसमज आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत गैरसमज
१ सेक्स ड्राईव्ह कमी होते
सत्य : सेक्स ड्राईव्हवर काहीही परिणाम होत नाही.
२ वेदनादायी असते
सत्य : रक्तदान त्रासदायक किंवा वेदनादायी नसते. सुई टोचण्याचा त्रास केवळ क्षणिक असतो.
३ महिलांनी करू नये
सत्य : महिलांची हिमोग्लोबीनची पातळी २.५ च्या वर असेल, मासिकपाळी चालू नसेल, गरोदर किंवा स्तनपान देत नसेल रक्तदान करू शकते.
४ मधूमेह असलेले रक्तदान करू शकत नाही
सत्य : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्यास मधूमेह असलेले लोक रक्तदान करू शकतात. मात्र इन्सुलिन घेत असल्यास रक्तदान करू नये.
५ इंफेक्शन होते
सत्य : रक्तदानाच्या वेळेस स्टरलाईज सूई आणि स्वच्छता पाळली गेल्यास इंफेक्शन होणार नाही.
६ खूप रक्त घेतले जाते
सत्य : रक्तदानाच्या वेळेस केवळ ३५० मिली रक्त घेतले जाते. २४ तासात ब्लड व्हॉल्युम पुन्हा रिस्टोर होते.