आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अनेक महिलांना आणि पुरूषांना रात्री झोपण्यापूर्वी केस धुवून झोपण्याची सवय असते. परंतु, ही सवय आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे सर्दी, तापासह शरीराशी संबंधित अनेक गंभीर आजारही होतात. रात्री केस धुणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण आहे. ओले केस घेऊन झोपल्यामुळे कोणते आजार होऊ शकतात, ते जाणून घेवूयात.
होऊ शकतात हे आजार
१ डोकेदुखी
यामुळे सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. याचे मुख्य कारण अचानक तापमानात झालेला फरक असतो.
२ हायपोथेरमीया
जास्त थंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते.
३ खाज येणे
ओल्या केसांमध्ये झोपल्यामुळे डोक्यातील त्वचेवर ओलावा राहतो. त्यामुळे केसांमध्ये खाज येते.
४ केस गळणे
ओल्या केसांनी झोपल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते.
५ कोंडा
ओल्या केसांमुळे डोक्यातील त्वचेतही ओलावा राहतो. कोंडा होतो.
६ इन्फेक्शन
ओले केस सरळ उशी आणि उशीच्या कव्हरच्या संपर्कात येतात. यामुळे केसांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
७ मांसपेशींमध्ये वेदना
अंगदुखी किंवा मानेच्या भागातील मांसपेशींना असह्य वेदना होऊ शकतात.
Visit : arogyanama.com