आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. हा आजारही अतिशय जीवघेणा आहे . त्यातील एक कर्करोग म्हणजे घशाचा कर्करोग होय. हा कर्करोग तंबाखू किंवा सिगारेटच्या सेवनाने होतो.त्यामुळे घशाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. जाणून घ्या या घशाच्या कर्करोगाची लक्षणे आणि उपचार याविषयी
घशाच्या कर्करोगाची लक्षणे खालीलप्रमाणे :
१) आवाजात बदल होणे.
२) प्रलंबित खोकला असणे.
३) घसा दुखणे.
४) गिळण्यास अडचण येणे.
५) घशात खरखर होते.
६) अचानक शरिराचे वजन घटणे.
७) डोळे, जबडा आणि घशात सूज होणे.
८) थुंकीत रक्त येणे.
९) कानामध्ये वेदना.
१०) घशामध्ये निष्कारण काहीतरी अडकल्यासारखे वाटणे.
या आजारावर उपचार खालीलप्रमाणे :
१) विकिरण पद्धत :
घशाच्या कर्करोगासाठीच्या विकिरण पद्धतीमध्ये गामा किरणांसारख्या किरणांच्या नियंत्रित मात्रांचे वापर करून विशिष्ट भागांमध्ये घशाच्या कर्करोगाच्या कोशिकांना लक्ष करून नष्ट केले जाते.
२) केमोथेरेपी :
केमोथेरेपीमध्ये काही विशिष्ट औषधांचा वापर केला जातो. जे घशाच्या कर्करोगाच्या कोशिका नष्ट करण्यात सहायक असतात. केमोथेरेपी घशाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी प्रकाश विकिरणासह सहकारी पद्धत म्हणून वापरले जाते.
३) शस्त्रक्रिया :
शस्त्रक्रियेद्वारे, घशाच्या कर्करोगाची गाठ काढली जाऊ शकते. गाठीपासून मुक्तता मिळण्यासाठी, थायरॉयडसारखे इतर तंतू अथवा भाग काढण्याची गरज पडू शकते. हे विकसित होणाऱ्या गाठीच्या आकारावर अवलंबून असते. घशाच्या कर्करोगाचा प्रसार पुढे टाळण्यासाठी शेजारील लिंफ ग्रंथीसुद्धा काढाव्या लागू शकतात.
४) मल्टीमॉडलिटी उपचार :
यामध्ये शस्त्रक्रियेनंतर प्रकाश विकिरण किंवा केमोथेरेपीचा वापर केला जातो. हे साधारणपणे मोठ्या गाठींसाठी केले जाते.