आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चॉकलेटचे आकर्षण लहान मुलांइतकंच मोठ्यांनाही असतं. चॉकलेट हा पदार्थ कधीही तोंडाला पाणी आणतो. मात्र अधिक प्रमाणात चॉकलेट खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घ्या चॉकलेट खाण्याने शरीराचे होणारे नुकसान –
हाडे कमजोर होतात – सतत चॉकलेट खाल्ल्यास हाडांमधील पोषक तत्त्व आणि खनिज यांचे प्रमाण कमी होते आणि हाडे कमजोर होतात. तसेच चॉकलेटमधील काही घटक हाडांतील कॅल्शियम आणि साखर शोषून घेते. त्यामुळे शरीराला कॅल्शियमची कमतरता जाणवते आणि हाडे कमजोर होतात.
स्थूलता – चॉकलेट स्थूलपणा वाढण्यास कारण ठरते. चॉकलेट मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास स्थूलता वाढते आणि शरीर फुगते.
डायबेटिज – चॉकलेट खाल्ल्याने शरीराच्या इन्सुलिनवर त्याचा परिणाम होतो. तसेच चॉकलेट खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते,त्यामुळे डायबेटिज होण्याची शक्यता असते.
मेंदूची कार्यक्षमतेवर परिणाम – चॉकलेटचे अतिसेवन मेंदूसाठी हानिकारक असते. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमताही मंदावते.
चॉकलेटची सवय ते अॅडिक्शन – एका मर्यादेपलीकडे चॉकलेटचे सेवन करू नये. कारण नियमित चॉकलेट खाण्याची सवय अॅडिक्शन बनू शकते. व चॉकलेट खाल्ले नाही तर बैचेनी होण्याबरोबरच अनेक समस्या निर्माण होतात.