आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अंडी आरोग्यासाठी उत्तम असते. रोज एक अंडी खाण्याचा सल्ला कित्येक लोक देत असतात. पण जर अंडी कोणी आणि कधी खावे याची माहिती नसेल तर त्याचा तुम्हाला नुकसानही होऊ शकतो. रोज अंडी खाल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो. यामुळे हृदयाला याचा धोका होऊ शकतो. रोज एक पेक्षा जास्त अंडी खाल्याने कॅलरी वाढते आणि यामुळे वजनही वाढतो. चला मग जाणून घेऊ अंडी खाण्याचे नुकसान
कॅलरी आणि कोलेस्ट्रॉल ची मात्रा अंडी मध्ये जास्त प्रमाणत असते. एका अंडीत जवळपास ७५ कॅलरी असतात. अशा पद्धतीचे जर आपण रोज सकाळी ३ अंडी खाले तर २२५ कॅलरी आपल्या शरीरात जमा होतात. जर आपण प्रमाणा पेक्षा जास्त अंडी खाल्याने वाढत्या कॅलरीमुळे आपला वजन वाढू शकतो.
अंड्यातील पिवळ्या भागात जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल आणि फॅट असतात. जर आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर अंडी उकळण्याच्या आधी किंवा उकळल्यानंतर त्यातील पिवळा भाग काढून टाका. या पद्धतीने जर रोज अंड्याचा फक्त पांढरा भाग खाल्याने याचे काही नुकसान होत नाही. उलट याचा शरीरासाठी फायदा होतो.
अंडी विकत घेताना योग्य दुकानातून विकत घ्या. खूप दिवसाचे अंडी खाणे टाळा. अंडी शिजवताना नेहमी व्यवस्थित शिजवून घ्या. जर अंडी व्यवस्थित शिजली नसेल तर उल्टी आणि पोट दुखीचे त्रास निर्माण होऊ शकतात. म्हणून नेहमी अंडी नीट शिजवून खावे.
ज्या लोकांना हृदयाचे आजार असेल तर त्यांनी अंड्यातील पिवळा भाग खाणे टाळावे. यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असल्याने याचा हृदयाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. खूप जास्त अंडी खाल्याने लकवा, नंपुसकता, पायात दुखणे, वजन वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकता.