आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण पदार्थांना चव येण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्याचा वापर करतो. त्या सर्व पदार्थांमध्ये आपल्याला मीठ टाकावे लागते. तेव्हाच त्या पदार्थांना चव येते. त्यामुळे कोणतेही पदार्थ बनवताना आपल्याला मिठाचा उपयोग करावा. मिठाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे आपल्या पदार्थांना चवच देत नाहीत. तर आपल्या काही आजारांवरही फायदेशीर आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या मिठाचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहे.
मिठाचे फायदे खालीलप्रमाणे :
१) काळे मीठ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण या मिठामध्ये लोह तत्वे आणि गंधक मिसळलेले असते. तसेच हे मीठ कफ आणि पित्तवर्धक आणि वातरोधक असते. त्यामुळे त्याचा आपल्या शरीराच्या विकासासाठी खूप फायदा होतो.
२) स्वयंपाकामध्ये समुद्री मीठ आणि सैंधव यांचा वापर आलटून पालटून वापर करणे श्रेयस्कर मानले गेले आहे.
३) काळे मीठही आपण वापरू शकतो. या मिठाचा वापर कोशिंबिरी मध्ये किंवा सलाडवर घालण्यासाठी केला जातो. हे मीठ पाचक आहे. त्यामुळे याचाही आपल्या आरोग्याला खूप चांगला फायदा होतो.
४) सैंधव मिठाचा वापर उपवासाच्या पदार्थांमध्ये केला जातो. पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि भूक वाढण्यासाठी हे मीठ खूप फायदेशीर आहे. हे मीठ कफवर्धक नाही. समुद्री मिठामध्ये आयोडीन मोठ्या प्रमाणावर असते.