• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

सावधान, हे ६ संकेत असू शकतात ‘हार्ट अटॅक’ची पूर्वसूचना

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 27, 2019
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
heart-attack

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- हृदयविकाराचा झटका आल्यावर हृदयाची ब्लड पंप करण्याची क्षमता कमजोर होते. याचाच अर्थ हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाचा ताबडतोब मृत्यू होत नाही. असा प्रसंग उद्भवल्यास त्या व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे.हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही संकेत आपल्याला शरीराकडून मिळत असतात ते आपल्याला माहित असले पाहिजेत.
तज्ज्ञ सांगतात की, बहुतांश हार्ट फेल्युअरच्या केसेसमध्ये हार्ट फेल्युअरचे संकेत १५ दिवस आधीच मिळतात. हे संकत ओळखून उपचार सुरू केल्यास अनेक संभाव्य धोके टाळता येतील आणि प्राणही वाचवता येतो.

आर्टरीज ब्लॉकेजमुळे रक्त हृदयापर्यंत पोहचत नाही. अशावेळी हृदयविकाराचा झटका येतो. हा झटका किती मोठा किंवा गंभीर आहे हे आर्टरीजमधील ब्लॉकेजवर अवलंबून असते. जर ब्लॉकेज जास्त असतील किंवा वेळेअगोदर ब्लॉकेज दूर केले नाहीत तर हृदय काम करणे बंद करू शकते. अशावेळी रुग्णाचा काही वेळातच मृत्यूदेखील होऊ शकतो.

हृदयाचे ठोके बंद होतात तेव्हा ते कार्डियाक अरेस्ट असते. काही इलेक्ट्रिकल तरंग या हृदयाच्या ठोक्यांसाठी जबाबदार असतात. जेव्हा या इलेक्ट्रिकल तरंग बंद होतात तेव्हा हृदयाचे ठोके पडणे बंद होते. यामधील जास्तीत जास्त प्रकरणात रुग्णाचा मृत्यू होतो, तर काही रूग्णांच्या हृदयाला शॉक दिल्यानंतर ठोके पुन्हा सुरू होतात. हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाची पंप करण्याची क्षमता कमजोर होते. म्हणजे यामध्ये रुग्णाचा अचानक मृत्यू होत नाही, परंतु वेळेत उपचार करणे आवश्यक असते.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपल्या शरीराकडून काही संकेत प्राप्त होतात. ते ओळखता आले पाहिजेत. यापैकी एक संकेत म्हणजे विनाकारण येणारा थकवा होय. हृदयविकाराचा झटका आल्यावर रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता होते. विनाकारण थकवा आणि कमजोरी जाणवते. हार्ट बीट वाढणे हा आणखी एक संकेत आहे. हृदयाद्वारे योग्य पद्धतीने ब्लड पम्पिंग न झाल्यामुळे मेंदूपर्यंत रक्ताचा योग्य प्रकारे पुरवठा होऊ शकत नाही. अशा वेळी मेंदू भूक लागण्याचा संकेत देऊ शकत नाही. त्यामुळे भूक न लागणे हा देखील एक संकेत आहे. शरीरामध्ये योग्य प्रकारे रक्त पुरवठा न झाल्यामुळे चेहरा किंवा पायावर सूज येते. हा सुद्धा एक संकेत आहे. तसेच शरीराचा रक्त प्रवाह बिघडल्यामुळे फुप्फुसांमध्ये पाणी भरते. अशा वेळी श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेण्याचा त्रास होणे हो एक हृदविकाराचा झटका येण्याचा संकेत आहे. तसेच फुप्फुसांमध्ये पाणी भरल्यामुळे कफ आणि खोकल्याची समस्या हार्ट फेल्युअरचा संकेत असू शकतो.

Tags: arogyanamaHeartheart attacksignalsSymptomsआरोग्यनामासंकेतहृदयहृदयविकार
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021