आरोग्यनामा ऑनलाईन टीम- अनेकजण डे आणि नाईट क्रीम वापरतात पण त्यांना या दोन क्रीममध्ये नेमका फरक काय आहे. हेच समजत नाही. त्यामुळे ही क्रीम वापरताना आपण जर या क्रीममधील फरक जाणून घेतला पाहिजे. कारण या दोनही आपला चेहरा तरुण दिसण्यासाठी मदत करतात.
डे क्रीमचे फायदे खालीलप्रमाणे :
डे क्रीम ही त्वचेच्या सुरक्षेसाठी मदत करते. या क्रीममध्ये एसपीएफ असते. ते बर्निंगपासून त्वचेचा बचाव करते. या क्रीमला मेकअपच्या खाली लावले जाते. त्यामुळे त्याचा फॉर्मुला लाईट आणि नॉनग्रिसी असतो. त्यामुळे लवकर एब्जॉर्ब होते. आणि फाऊंडेशन लावायला चांगला बेस तयार करते. आणि त्यातील काही डे क्रीममध्ये एंटी-एंजिग गुण पण असतात. ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते.
नाईट क्रीमचे फायदे खालीलप्रमाणे :
आपली स्किन जास्त काम रात्रीच करते. नाईट क्रीम आपल्या त्वचेला रात्री मॉइश्चराइज करते. रात्री उन्हाची चिंता नसते. या क्रीममध्ये एसपीएफ नसते. आणि एंटी-एजिंग इंग्रीडिएंट्स जास्त प्रमाणात असते. त्यामुळे नाईट क्रीम ही डे क्रीम पेक्षा जास्त हेवी असते.
या दोन्ही क्रीममधील फरक खालीलप्रमाणे :
या दोन क्रीममध्ये खूप फरक असतो. दोन्हीचे टेक्सचर पण वेगवेगळे असते. नाईट क्रीमला जर आपण दिवसा लावलं तर तुमची स्किन जास्त ग्रीसी होईल. आणि ती सनस्क्रिनचे कामही करणार नाही. त्यामुळे या क्रीमचा दिवसा लावल्याने काही उपयोग होणार नाही.