आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. काहीवेळा तर चूकीच्या डाएटमुळे शरीराचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. वजन कमी होण्याऐवजी शरीराच्या अन्य समस्या या डाएटमुळे उद्भवतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी योग्य आहार घेण्याची आवश्यकता असते. अनेक खाद्यपदार्थांमुळे दीर्घ काळापर्यंत भुकेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. या पदार्थांमध्ये फॅट जाळण्याची क्षमतादेखील असते. या खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने अतिरिक्त भूक लागणार नाही आणि वजनही कमी करता येऊ शकते.
तीन सफरचंद खा, वजन कमी करा
वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थांची क्रेव्हिंग करणे चांगला उपाय आहे. कारण फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. शिवाय, ज्या महिला दररोज तीन सफरचंदाचे सेवन करतात त्यांचे वजन आठवड्याच्या आत २ पाउंडने कमी होते, असे तज्ज्ञ सांगतात. पीनट बटर किंवा सुका मेवा फॅट्सचे चांगले स्रोत आहेत. यामध्ये हानिकारक फॅट्स नसतात. तसेच यामुळे शरीरात फॅट वाढण्याची भीती नसते. पीनट बटरच्या सेवनाने अडीच ते तीन तासांपर्यंत भूक लागत नाही, असे हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका संशोधनातून समोर आले आहे.
बटाट्याचे सेवन असे करा
डार्क चॉकलेट दिवसातून एक किंवा दोनवेळा सेवन केल्यास क्रेव्हिंग नियंत्रणात राहते. मिल्क चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो, असे तज्ज्ञ सांगतात. तसेच बटाटे डीप फ्राय करण्याऐवजी उकळून किंवा बेक करून सेवन केल्यास बटाट्यातील स्टार्च पाणी शोषून घेते. अशाप्रकारे बटाट्याचे सेवन केल्यास शरीरात फॅटी अँसिड तयार होत नाही. शिवाय यामुळे लठ्ठ होण्याचा धोका खूप कमी होतो.