आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी आपण सर्वप्रथम जो फंडा अजमावतो, तो आहे डाएट कंट्रोल. परंतु, तुम्हाला माहित आहे की, डाएट करण्याच्या दरम्यान सुद्धा अनेक वस्तू सेवन केल्या जातात ज्या वजन वाढवू शकतात. जर तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचे असेल आणि डाएटिंग करत असाल तर काही वस्तूंपासून दूर राहिले पाहिजे. या वस्तू कोणत्या ते जाणून घेवूयात…
बटर डाएटमधून करा स्किप :
डाएटिंग दरम्यान बटरचे सेवन अजिबात करू नका. बटरमध्ये 80% फॅट असते. तसेच हाय कोलेस्ट्रॉल युक्त अनेक पदार्थ असतात.
तळलेले पदार्थ टाळा :
डाएट दरम्यान तळलेले पदार्थ टाळा. यामध्ये हाय कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढते.
आयस्क्रीम टाळा :
आयस्क्रीम खाण्याने सुद्धा वजन वाढते. यामध्ये शुगर आणि फॅट भरपूर प्रमाणात असल्याने वजन वाढते.
जंक फूड्स टाळा :
वजन कमी करण्यातील सर्वात मोठा अडथळा जंक फूड आहे. डाएटमध्ये चाउमीन, पिझ्झा, सोया चाप सेवन करू नका.
ड्राय फ्रुटस कमी सेवन करा :
ड्राय फ्रुटस आरोग्यासाठी चांगले असले तरी यामध्ये फॅट आणि कॅलरी भरपूर असते. ड्राय फ्रुटस वेगाने वजन वाढवते.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.