आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अॅवोकॅडो हे फळ एक सूपरफूड असून यात मोनोसॅच्युरेटेड फॅट तसेच फायबर, फोलेट व व्हिटॅमिन बी ५ भरपूर असल्याने हृदय निरोगी राहते. हे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते. टोस्ट, अंड्यासोबत ते चविष्ठ लागते. चांगल्या प्रतीचे अॅवोकॅडो कसे ओळखावे व ते कसे साठवून ठेवावे, याविषयी जाणून घेवूयात.
किती खावे
* यात फॅट आणि कॅलरीज अधिक प्रमाणात असतात. एका अॅवोकॅडामध्ये २५० कॅलरीज आणि २० ग्रॅम फॅट असतात. म्हणून एका दिवसात केवळ अर्धेच फळ खावे. आठवड्यातून ४ अॅवोकॅडो खावेत.
असे ओळखा चांगले फळ
१ बाह्य आवरण खराब नसावे.
२ जड असलेले अॅवोकॅडोच खरेदी करा.
३ पिकलेले आहे का हे तपासावे. बाह्य आवरण हलक्या हाताने दाबून पहा.
असे साठवून ठेवा.
* इतर फळांसोबत बाहेर टेबलवर ठेवा.
* अति पिकलेले अॅवोकॅडो पाच दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये ठेऊ शकता.
* कापलेल्या फोडींवर थोडेसे लिंबू पिळून व प्लॅस्टिक रॅपमध्ये घट्ट बांधून फ्रीजमध्ये ठेवा.
Visit : arogyanama.com