पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – अनेकजण जेवण तर वेळेवर करतात. परंतु जो आहार घ्यायाला पाहिजे तो कधीच घेत नाहीत. त्यामुळे ते शरीराने अधिक कमजोर होतात. अशावेळी त्यांना वाटते. कि आपण काहीही, आणि कितीही खाल्लं तरी त्यांची तब्बेत सुधारत नाही. अशा व्यक्तींनी आपण किती प्रोटीन आणि व्हिटॅमिन युक्त आहार घेत आहोत. त्याचे परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींना प्रोटीन आणि व्हिटॅमिन वाढवायचे असतील तर त्यांनी खालील आहार घ्यावा.
शाकाहारी व्यक्तींनी या पदार्थांचा आहारात समावेश करावा
१) वरणभात आणि पालक :आपल्या शरीरातील प्रोटीन वाढवण्यासाठी वरणभातासोबत पालक भाजी खाली तर शरीरातील प्रोटीन वाढण्यास मदत होईल. कारण डाळीत खूप प्रोटीन असतात. आणि पालक भाजी अन्नपचन होण्यास मदत करते. तसेच शरीरातील कॅल्शियम वाढवते.
२) कडधान्य : तुम्ही आहारात सर्व कडधान्यांचा समावेश करा. रात्री मटकी भिजु घाला. आणि ती सकाळी खा. यामुळे तुमच्या शरीरातील प्रोटीन वाढण्यास मदत होईल. त्यामुळे अशा सर्व कडधान्यांचा आहारात समावेश करा.
३) बाजरी / ज्वारी : आपल्या ओट्स, बाजरी, ज्वारी या अन्नधान्याचा समावेश करा. यामुळे तुमचा शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन आणि बाकीची पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होईल.
४) ड्रायफूड्स : तुम्ही तुमच्या आहारात ड्रायफूड्स चा समावेश करा. तसेच सोयाबीन सुद्धा आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे तुम्ही सोयाबीनचाही आपल्या आहारात समावेश करू शकता. मसूरच्या डाळीमध्येही खूप प्रोटीन असतात. त्यामुळे तुम्ही मसूर डाळही खाऊ शकता.
५) पालेभाज्या : तुम्ही तुमच्या आहारात रोज पालेभाज्यांचा उपयोग केला तर, तर तुम्हाला त्यातून कल्शियम मिळेल. पालेभाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे नियमित पालेभाज्यांचे सेवन करा.