आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नैसर्गिक स्लिम असणारे अनेकजण दर दोन तासाला काही ना काही खात असतात. यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली राहते आणि दिवसभर ऊर्जा मिळते, असे दिसून येते. शरीराच्या प्रकारानुसारच आहार घेणे कधीही योग्य ठरते. सेलिब्रिटी घेतात म्हणून आपणही डोळे बंद करून तसा आहार घेणे चुकीचे आहे. यासाठी एखाद्या आहारतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आहार व व्यायामाचे वेळापत्रक तयार केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.
वजन कमी करण्यासाठी आहार कमी करणे अयोग्य असून त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. तसेच वजन वाढवण्यासाठीदेखील जास्त जेवण न करता ते थोड्या थोड्या प्रमाणात करावे. वजन कमी करण्यासाठी जशी अधिक मेहनतीची गरज असते त्याचप्रमाणे सडपातळ व्यक्तीलादेखील वजन वाढवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. तज्ज्ञांच्या मते, पुरेशा पोषक द्रव्यांच्या अभावामुळे शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा परिणाम भोगावे लागतात. पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळे ताणतणाव, शारीरिक थकवा, थोडेसे कष्ट केल्यास दम लागणे, स्नायू कमजोर होणे, रक्त कमी होणे, त्वचेची चमक जाणे, केस गळणे अशा प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळतात.
अशी स्थिती सतत राहिल्यास मेटाबॉलिक सिंड्रोम जसे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि अँसिडिटी यामुळे पेप्टिक अल्सर होण्याची शक्यता वाढते. पचनक्रिया चांगली नसल्यास दिवसातून चार-पाच वेळा संतुलित आहार घ्यावा. दररोज दोन-तीन वेळा लिंबू पाणी प्यावे. जेवणात दोन केळी, २५० ग्रॅम शेंगदाणे किंवा शेंगदाणा चिक्कीचे सेवन करावे. हे सर्व पदार्थ दोन जेवणांमध्ये घेता येतील. यामुळे ५०० ते ६०० अतिरिक्त कॅलरी मिळते. कॅलरी जाळण्यासाठी लठ्ठ असलेल्या लोकांनी वेगाने चालावे. सडपातळ लोकांनी १५-२० मिनिटे सामान्यपणे चालावे. दररोज नियमित चालल्यानेदेखील पचनक्रिया चांगली राहते.
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याऐवजी जेवणातील कॅलरी नियंत्रित ठेवावी. गोड, तळलेले आणि मेदयुक्त खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे. हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. प्रत्येक जेवणात ३-४ चमचे तेल अथवा तुपाचा समावेश करावा. लठ्ठ लोकांनी जेवणापूर्वी आणि नंतर एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे जेवण जास्त जाणार नाही आणि भूकही लवकर मिटते.
ही काळजी घेतली तर चेहऱ्यावर पडणार नाहीत सुरकुत्या
शरीराचा भार असणाऱ्या मांड्या अशा पद्धतीने ठेवा मजबूत