आरोग्यनामा ऑनलाईन टीम – परफेक्ट फिगरसाठी महिला विविध मार्गांचा अवलंब करतात. यापैकी काही मार्ग ही खुपच धोकादायक असतात. यामुळे तुमची आरोग्यच नव्हे तर जीवनही धोक्यात येऊ शकते. काही महिला तर शॉर्टकट म्हणून वजन कमी करण्याच्या गोळ्या म्हणजेच डाएट पिल्स घेतात. तरुणींमध्ये डाएट पिल्स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, डाएट पिल्स घेण्याचा हा मार्ग घातक ठरू शकतो.
हे आहेत धोके
* या गोळ्यांमुळे एनर्जी लेव्हल कमी होते.
* कमी वयाच्या मुलींच्या संपूर्ण वाढीवर अत्यंत वाईट परिणाम होतो.
* हार्ट रेट वाढणे, चक्कर, जखमेचे रक्त लवकर न थांबणे, हार्ट अटॅक आणि मृत्यूदेखील येऊ शकतो.
* या गोळ्यांमध्ये विषारी, घातक रासायनिक पदार्थ असतात.
* या गोळ्या शरीराचा ताबा घेतात.
* शरीरात न्युट्रिशनल डेफिशिअन्सीज तयार होतात.
* लोह आणि कॅलशियम नष्ट होते.
पालकांनो हे लक्षात ठेवा
१) मुलांकडे लक्ष ठेवा. मुले डाएट पिल्स घेत असतील तर त्यांना रोखावे.
२) डाएट पिल्स मुलांच्या हार्मोन्सवर तर घातक परिणाम करतात. तसेच शारीरिक आणि मानसिक वाढीवरही आघात करतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)