आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : मधुमेह(Diabetics ) एक सामान्य आजार आहे. या आजारात रूग्णाला वारंवार लघवीला होते, तहान आणि भूकसुद्धा खुप लागते. जर मधुमेहात सावधगिरी बाळगली नाही आणि पथ्य पाळले नाही तर अनेक आजार जन्म घेतात. यामध्य स्ट्रोक, हृदयरोग, अल्सर आणि डोळ्यांशी संबंधीत आजारांचा समावेश आहे. या आजारात स्वादुपिंडातून इन्शुलिन निघणे बंद होते. तर, रक्तात साखरेचा स्तर जास्त होतो. तज्ज्ञांनुसार, डायबिटीजमध्ये(Diabetics ) ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवणे खुप कठिण असते.
यासाठी खाणेपिणे आणि दिनचर्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. सोबतच वर्कआउट सुद्धा रोज आवश्यक आहे. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी तुम्ही पिस्ताचे सेवन सुद्धा करू शकता. अनेक शोधांमध्ये खुलासा झाला आहे की, पिस्ताचे सेवन केल्यास ब्लड शुगरमध्ये सुधारणा होते. मात्र, यासाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत की, एका दिवसात किती पिस्ते सेवन केले पाहिजे.
रिव्ह्यू ऑफ डायबेटीक स्टडीजमध्ये छापलेल्या एका शोधानुसार, पिस्ता डायबिटीज रूग्णांसाठी औषधासमान आहे. याच्या सेवनाने खुप लवकर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. पिस्ता ऊर्जेचा स्त्रोत आहे. सोबतच यामध्ये प्रोटीन आणि फॅट आढळते, ज्यामुळे पोट मोठ्या कालावधीपर्यंत भरलेले राहते. याशिवाय अन्य एका शोधात सुद्धा पिस्ता डायबिटीज रोगासाठी औषध असल्याचे म्हटले आहे. या शोधात लागोपाठ 12 आठवडे पिस्ता खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
असे करा सेवन
researchgate.net वर प्रसिद्ध शोधात रोज 25 ग्रॅम पिस्ता खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहाते. तर, Review of Diabetic Studies मध्ये रोज 30 पिस्ता खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, सॉल्टेड पिस्ता खाऊ नये. एक बाऊल फ्रूट सलाडसोबत पिस्ताचे सेवन करावे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळा