आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes Study | अनेकदा मधुमेहाची (Diabetes) प्रकरणे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात. पण का? या प्रश्नाकडे शास्त्रज्ञांचेही लक्ष लागले आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या एका संशोधनात निष्कर्षही समोर आले आहेत. महिलांपेक्षा पुरुषांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते याची काही कारणे यातून स्पष्ट होतात. त्यांच्याबद्दल जाणून घेवूयात. (Diabetes Study)
कॅनडातील कॉन-कॉर्डिया विद्यापीठातील (Concordia University) संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. या विद्यापीठातील संशोधक कॅरी डेलेनी आणि सिल्व्हिया सँटोसा यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले. या संशोधनाचा अहवाल ओबेसिटी रिव्ह्यू (Obesity Review) जर्नल (Journal) मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
त्यांच्या संशोधनादरम्यान, संशोधकांनी सुमारे 200 शोधनिबंधांचा अभ्यास केला. शरीरात साठलेली चरबी (Fat) मधुमेह होण्यास आणि वाढविण्यात आपली भूमिका कशी बजावते हे पाहण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. (Diabetes Study)
यावरून असे दिसून आले की स्त्रिया आणि पुरुषांच्या शरीरात चरबी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारे साठवली जात असल्याने, मधुमेहाशी संबंधित स्थिती देखील भिन्न असल्याचे दिसून आले.
म्हणूनच पुरुषांमध्ये मधुमेह जास्त
कॉन-कॉर्डिया युनिव्हर्सिटीच्या परफॉर्मन्स सेंटरमधील इतर तज्ज्ञांसमोर तिच्या संशोधन अभ्यासाचे निष्कर्ष सादर करताना कॅरी डेलनी म्हणाल्या, मधुमेहाचा पोटाभोवती साठलेल्या चरबी (Abdominal Fat) शी जवळचा संबंध आहे. महिलांच्या शरीरात ही चरबी त्वचेखालीच साठवली जाते, तर पुरुषांमध्ये, अंतर्गत अवयवांभोवती चरबी जमा होते.
इतकेच नाही तर पुरुषांमधील फॅट-सेल्स (Fat-Cells) त्यांचा आकार वाढवतात. तर महिलांमध्ये त्याची संख्या वाढते.
मोठ्या आकाराच्या चरबीच्या पेशी नैसर्गिकरित्या शरीराच्या इम्युनिटी (Immune System) चे जास्त नुकसान करतात.
म्हणूनच स्त्रियांपेक्षा पुरुषांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
मात्र, हा अंतिम निष्कर्ष नाही, असेही कॅरे यांनी नमूद केले. या विषयावर अजून संशोधनाची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes Study | study finds origins of diabetes may differ in men and women
Food For Men | आनंदी वैवाहिक जीवनासाठी पुरुषांनी खाव्यात ‘या’ 3 गोष्टी, होतील जबरदस्त फायदे