आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes Research | मधुमेह (Diabetes) लोकांना झपाट्याने आपल्या विळख्यात घेत आहे. मग तो टाईप 1 असो वा टाईप 2 मधुमेह (Type 1 Or Type 2 Diabetes). तो आटोक्यात आणण्याची नेहमीच चिंता असते. धावपळीचे जीवन आणि असंतुलित आहार ही या आजाराच्या वाढीची प्रमुख कारणे आहेत. मात्र, या आजारात निष्काळजीपणा अजिबात करू नये. टाईप 2 मधुमेह ही एक गंभीर स्थिती आहे (Diabetes Research).
या काळात तुमचे स्वादुपिंड नीट काम करत नाही किंवा तुमचे स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन (Insulin) तयार करू शकत नाही. इन्सुलिनच्या अपुर्या उत्पादनामुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) सतत वाढत राहते. यामुळे हृदयविकाराचे गंभीर आजार आणि स्ट्रोकसारखे (Heart Disease, Stroke) धोके होऊ शकतात.
टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर संतुलित आहारासोबत ठराविक प्रकारचे हॉट ड्रिंक (Hot Drink) नियमित आहारात समाविष्ट केले तर हा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. जर तुम्ही हे ड्रिंक तुमच्या जेवणात समाविष्ट केले तर ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. या संदर्भात, संशोधकांनी कॅमोमाईल चहा (Chamomile Tea) चा नित्यक्रमात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे (Diabetes Research).
संशोधनात, कॅमोमाईल चहाचे फायदे तपासले गेले. यादरम्यान त्यात अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म (Anti-Inflammatory Properties) आढळून आले. हे स्वादुपिंडाच्या पेशींचे नुकसान वाचवू शकते.
64 लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार, टाईप 2 डायबिटिजने ग्रस्त लोक ज्यांनी आठ आठवडे जेवणासोबत कॅमोमाइल चहा चे सेवन केले
त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जेवणासोबत पाणी घेतलेल्या लोकांपेक्षा कमी होते.
याशिवाय अनेक प्राण्यांचाही अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये हे उघड झाले आहे की कॅमोमाईल चहा रक्तातील साखरेची वाढती पातळी झपाट्याने कमी करू शकतो.
यासोबतच खाल्ल्यानंतर रक्तातील साखर (Blood Sugar) वाढण्यापासून रोखण्यासाठीही तो फायदेशीर ठरू शकतो.
Type 2 Diabetes ची लक्षणे (Symptoms Of Type 2 Diabetes)
– तहान आणि भूक वाढली
– वारंवार लघवीला होणे
– वजन कमी होणे
– थकवा
– धूसर दृष्टी
– जखमा खूप उशीरा भरणे
– त्वचा काळी पडणे
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes Research | diabetes research patients with type 2 diabetes should include hot drink blood sugar will be under control
Home Remedies | चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका करायचीय?; मग जाणून घ्या ‘हे’ 5 घरगुती उपाय