आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे (Cancer) प्रमाण वाढत चालले आहे. यातील ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर अतिशय घातक आहे. याचे आणखी चार उपप्रकार आहेत. हा कर्करोग (Cancer) जलदगतीने शरीरात पसरल्याने त्याची मेंदू आणि फुफ्फुसांनाही लागण होते. यावर अद्यापतरी प्रभावी उपाय नाही. मात्र, मधुमेहावर वापरले जाणारे एक औषध यावर प्रभावी ठरत असल्याचे मत चिनच्या झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे.
ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर
1) यात चयापचयातील एकेआर 1 बी 1 हे विकर वाढते. व त्यामुळे मेटॅस्टॅटिस प्रक्रियेचा वेग वाढून मृत्यू होऊ शकतो.
2) एपलरेस्टॅट नावाचे औषध एकेआर 1 बी 1 या विकराला रोखते. हे औषध जपानमध्ये मधुमेहावर वापरले जाते.
3) मधुमेहाच्या औषधाचा कर्करोगाच्या उपचारात फायदा होतो, हा प्रयोग अजून पूर्ण झालेला नाही.
4) मधुमेहाचे औषध असलेल्या एपालरेस्टॅटचा वापर करून कर्करोग बरा करता येतो या निष्कर्षांप्रत येण्यास अजून चाचण्यांची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे