आरोग्यनामा ऑनलाईन- इन्सूलिन रक्तातील साखरेला उर्जेत परावर्तीत करते, यासाठी डायबिटीजच्या(Diabetes ) रूग्णांना इन्सुलिनचा अतिरिक्त डोस दिला जातो. पॅन्क्रियाज जेव्हा योग्य प्रकारे काम करत नाही तेव्हा रक्तपेशींना योग्य प्रमाणात उर्जा मिळत नाही. तेव्हा इन्सुलिन शुगरपासून (Diabetes )उर्जा बनवण्याचे काम करते.
शुगर लेव्हल वाढण्याची ही आहेत कारणे
एक्सपर्टचे म्हणणे आहे की, रक्तातील शुगर वाढण्याची अनेक कारणे आहेत. जंक फूड जास्त खाणे, जास्त गोड पदार्थ खाणे, जास्त प्रोटीनवाल्या वस्तू खाणे, ग्लायसेमिकवाल्या वस्तू कमी खाणे, इत्यादी शुगर लेव्हर वाढण्याची कारणे आहेत. हे सर्व दोष आपल्या खराब जीवनशैलीचे आहेत.
हे नियमित सेवन करा
1 हिरव्या पालेभाज्या
डायबिटीजच्या धोक्यापासून वाचण्यासाठी नियमित हिरव्या पालेभाज्या सेवन कराव्यात. पालक, कारले, ब्रोकली, गाजर, मेथी, कोबी, टोमॅटो, शतावरी, काकडी, बीन्स या भाज्यासुद्धा खाव्यात.
2 स्टार्कवाल्या भाज्या खाऊ नये
रक्तातील साखर वाढल्यानंतर जास्त स्टार्कवाल्या भाज्या बटाटे, कोबी, मका, घेवडा, मटार, छोले, मसूर डाळ, भोपळा, बिट सारख्या वस्तूंपासून दूर राहावे.
3 फळे
एवोकाडो, ब्लॅकबेरी, रास्पबेरी, खरबूज, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, लिंबू, नारळ, ऑलिव्ह, स्टार फ्रूट, बोर, कीवी, चेरी, पेरू खावेत.
4 बदाम-आक्रोड
बदाम-आक्रोड, काजू, शेंगदाणे सारखा सुकामेवा सेवा सेवन करा.
5 मासे
मांस, मासे डायबिटीजमध्ये उपयोगी आहे. साल्मन, सरडाइन, झींगा आणि ट्राऊट मासे ओमेगा-3 फॅटी अॅसिडयुक्त असतात त्याचे सेवन करावे. रेड मीट सेवन करू नये.
6 तेल आणि फॅट
डायबिटीजच्या रूग्णांनी तूप, तेल, रिफाईंडसारखे पदार्थ कमी सेवन करावे.
7 अंडे आणि डेअरी प्रॉडक्ट
अंडे आणि डेयरी प्रॉडक्ट्स आरोग्यासाठी लाभदायक असतात. दूधाऐवजी यॉगर्ट किंवा पनीर सेवन करणे चांगले ठरू शकते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.