आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes Facts | भारतात मागील काही वर्षांत मधुमेही रुग्णांच्या (Diabetic Patients) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेहाचे रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी (Wrong Lifestyle, Lack Of Physical Activity, Stress And Wrong Eating Habits). मधुमेहाचे 2 प्रकार आहेत. टाईप 1 मधुमेह आणि टाईप 2 मधुमेह (Type 1 Diabetes And Type 2 Diabetes). टाईप 1 मधुमेहामध्ये, स्वादुपिंड इन्सुलिन अजिबात तयार करत नाही, तर टाईप 2 मधुमेहामध्ये, स्वादुपिंडाद्वारे इन्सुलिन कमी प्रमाणात तयार केले जाते (Diabetes Facts).
काही संशोधनात असे दिसून आले आहे की प्रत्येक 15 पैकी 1 व्यक्तीला मधुमेह (Diabetes) आहे. डायबिटीज मेलिटस किंवा मधूमेह सोप्या भाषेत समजून घ्यायचा, तर हा एक असा डिसऑर्डर जो मोठ्या कालावधीपर्यंत हाय ब्लड शुगरशी म्हणजेच हायपरग्लाइसेमियाशी (Hyperglycemia) संबंधित आहे. मधुमेहाबद्दल लोकांच्या मनात अनेक सामान्य समज आहेत जे चुकीचे देखील असू शकतात. म्हणूनच आज आम्ही मधुमेहाशी संबंधित असेच काही मिथक आणि त्यांचे सत्य सांगत आहोत, ज्याबाबत जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे (Diabetes Facts).
1. मधुमेह असलेले लोक गोड खाऊ शकत नाहीत (People With Diabetes Can’t Eat Sugar)
Diabetes.co.uk च्या मते, मधुमेही साखर किंवा गोड पदार्थ अजिबात खाऊ शकत नाहीत हे सर्वात सामान्य मधुमेह मिथकांपैकी एक आहे. मधुमेह असलेल्या लोकांना संतुलित आहार (Balanced Diet) घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये कमी प्रमाणात साखर असू शकते. परंतु त्यांना त्यांचा आहार अशा प्रकारे संतुलित करावा लागेल की त्यांची ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) संतुलित राहील. मात्र यासाठी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
2. टाईप 2 मधुमेह फक्त लठ्ठ लोकांमध्ये होतो (Type 2 Diabetes Only Happens To Obese People)
मोठ्या काळापासून असा समज आहे की टाईप 2 मधुमेह फक्त लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या लोकांना होतो, परंतु हे चुकीचे आहे. Diabetes.co.uk च्या मते, जगातील सुमारे 20 टक्के लोक ज्यांना टाईप 2 मधुमेह आहे ते असे आहेत ज्यांचे वजन सामान्य किंवा कमी आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (Centers For Disease Control And Prevention) (सीडीसी) च्या राष्ट्रीय मधुमेह सांख्यिकी अहवाल 2020 च्या आकडेवारीनुसार, यूएसमध्ये टाईप 2 मधुमेह असलेल्या 11 टक्के लोकांचे वजन जास्त नाही किंवा लठ्ठही नाहीत.
3. मधुमेह असलेल्यांनी कार्बोहायड्रेट टाळावे (People With Diabetes Should Avoid Carbohydrates)
Diabetes.co.uk च्या मते, कार्बोहायड्रेट्स ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकतात, कारण कार्बोहायड्रेट्स ग्लुकोजचे तुकडे करतात आणि शरीराला ऊर्जा देतात. मात्र, कार्बोहायड्रेट्स अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये असतात जे शरीराला अनेक पोषक तत्वे देखील देतात.
त्यामुळे कार्बोहायड्रेट पूर्णपणे टाळणे चांगले नाही. कारण तुम्ही जे काही खातात त्यात बहुतेक कार्बोहायड्रेट असतात. उदा : भात, चपाती, फळे इ. त्यामुळे प्रथम मधुमेही रुग्णांसाठी योग्य सल्ला देणार्या आहारतज्ञांचा सल्ला घ्या.
4. गोड खाल्ल्याने मधुमेह होतो (Eating Sweet Only Causes Diabetes)
Medicalnewstoday नुसार, हा सर्वात सामान्य समज आहे की फक्त जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो.
पण जास्त साखर खाल्ल्याने थेट मधुमेह होत नाही.
जर एखाद्याला मधुमेहाची तक्रार असेल तर त्याला ब्लड शुगर कमी करण्यासाठी गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला नक्कीच दिला जातो.
जर तुम्ही शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेत असाल आणि तुमचे वजन खूप वाढले तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
अनेक गोड पदार्थ आणि पेयांमध्ये कॅलरीज जास्त असू शकतात, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो.
मात्र, गोड पदार्थांव्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टी तुमची कॅलरीज वाढवू शकतात.
2013 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कॅलरीज घेणे आणि बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)
नियंत्रित केल्यानंतर सुद्धा सोड्याचे सेवन केल्यास मधुमेहाचा धोका वाढतो.
5. टाईप 2 मधुमेह सौम्य असतो (Type 2 Diabetes Is Mild)
अनेकदा लोक मानतात की टाइप 2 मधुमेह सौम्य आहे.
पण त्या लोकांनी जाणून घ्यावे की, Diabetes.co.uk नुसार मधुमेहाचा कोणताही प्रकार सौम्य नसतो.
टाईप 2 मधुमेहावर योग्य उपचार न केल्यास, त्याची गंभीर स्थिती होऊ शकते आणि जीव धोक्यात देखील येऊ शकतो.
त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मधुमेहावर योग्य उपचार घ्या.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes Facts | diabetes myths and facts you should not believe type 2 diabetes type 1 diabetes eating sugar causes diabetes