आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते. रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित राहिल्यास दृष्टिदोष, हृदयरोग आणि अन्य आजार निर्माण होतात. यासाठी मधुमेहाच्या रूग्णांना गोड तसेच अन्य चविष्ठ पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागते. परंतु, असेकाही चविष्ठ पदार्थ आहेत ज्यांचे सेवन मधुमेह असलेले रूग्ण करू शकतात. तसेच यामुळे मधुमेह नियंत्रणातसुद्धा राहू शकतो. हे सुपरफूड्स कोणते ते जाणून घेवूयात.
स्टार्च, साखर आणि फायबर
तुम्हाला किती कार्बोहायडड्ढेट, स्टार्च, साखर और स्टार्चची गरज आहे हे प्रथम तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
हे सेवन करा
मधुमेहाच्या आहारात मधुमेहाचे रूग्ण मटार, मका, शेंगा, बटाटा यांचा समावेश असतो. ओट्स, कडधान्य आणि तांदुळ यास सुरूवातीच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. कडधान्यात अनेक पोषकतत्व असतात.
फायबर सेवन करा
भाज्या आणि फळांमधून मिळणारे फायबर पचनासाठी लाभदायक असते. यामुळे पोट भरलेले राहते. बटाट्यापेक्षा रताळे हा चांगला पर्याय ठरू शकतो. ओट मील, ब्राउन राइस नेहमी आहारात घ्या.