आरोग्यनामा ऑलनाइन टीम – Diabetes | मधुमेह हा असाध्य आजार असून, आजकाल अयोग्य आहार (Improper Diet), विस्कळीत जीवनशैली (Disrupted lifestyle) आणि शारीरिक हालचाली न केल्यामुळे अनेक लोक त्यास बळी पडले आहेत. या आजारावर कोणताही उपाय नाही, तो फक्त आटोक्यात आणता येतो, हा आजार आजकाल लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच होत आहे. (Diabetes)
मधुमेह (Blood Sugar) हा आजच्या काळातील अशा धोकादायक आजारांपैकी एक आहे, ज्यानंतर माणसाला केवळ आयुष्यभर औषधेच घ्यावी लागतात. त्यापेक्षा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार पाळावा लागतो. वैद्यकीय भाषेत साखरेचे प्रमाण वाढण्याला हायपरग्लायसेमिया म्हणतात.
जेव्हा पुरेसे इन्सुलिन (Insulin) तयार होत नाही तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. मधुमेही रुग्ण आहार आणि जीवनशैलीत बदल करून शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित (Blood Sugar Control) करू शकतात. यासाठी कोणत्या गोष्टी खाणे टाळाव्यात ते जाणून घेवूयात…
हे पदार्थ टाळा
1. द्राक्षे (Grapes) :
द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही जास्त असते. एक कप द्राक्षांमध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते, त्यामुळे द्राक्षे खाण्यापूर्वीही शुगरच्या रुग्णांनी विचार करून हे फळ फार कमी प्रमाणात सेवन करावे.
2. लिची (Lichi):
लिचीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्याची गणना जास्त साखर असलेल्या फळांमध्येही केली जाते. त्यामुळे जे मधुमेहाच्या रुग्णांनी लिची न खाणे उत्तम. (Diabetes)
3. फ्लेवर्ड दही (Flavoured Curd) :
फ्लेवर्ड दही मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. कारण, फ्लेवर्ड दह्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यात कृत्रिम गोष्टी असतात, ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
4. फुल क्रीम दूध (Full Cream Milk) :
मधुमेहाच्या रुग्णांनी फुल फॅट दूध पिणे टाळावे. कारण, त्यात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे इन्सुलिनची प्रतिकार क्षमता बिघडू शकते.
उपवास (Fasting) करताना (त्या व्यक्तीने मागील 8 तासांपासून काहीही खाल्ले नसेल),
निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 70 ते 99 mg/dl दरम्यान असते.
त्याच वेळी, अन्न खाल्ल्यानंतर, त्याचे प्रमाण 140 mg/dl पर्यंत वाढते.
Web Title :- Diabetes | diabetes these fruits increase blood sugar avoid to take care of health you should know AS
Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय