आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes | उच्च रक्त शर्करा (High Blood Sugar) , ज्याला हायपरग्लायसेमिया (Hyperglycemia) देखील म्हणतात, मधुमेह (Diabetes) आणि प्री-डायबेटिसशी (Prediabetes) संबंधित आहे. जेव्हा तुमची ब्लड शुगर लेव्हल जास्त असते परंतु मधुमेह म्हणण्याइतपत जास्त नसते तेव्हा प्री-डायबेटिस असतो (How To Control Blood Sugar).
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन Centers for Disease Control and Prevention (CDC) ने अहवाल दिला आहे की 13% अमेरिकन प्रौढांना मधुमेह आहे आणि इतर 34.5% लोकांना प्री-डायबेटिज (pre-diabetes) आहे. याचा अर्थ असा की सर्व अमेरिकन प्रौढांपैकी सुमारे 50% लोकांना डायबेटिज किंवा प्री-डायबेटिज आहे. तुम्ही काही सोप्या गोष्टी करू शकता ज्याद्वारे तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते. (Diabetes)
अशी करा ब्लड शुगर कंट्रोल
1. चांगली झोप घ्या (Get A Good Night’s Sleep)
हेल्थलाइनच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. खरं तर, झोपेची कमतरता ब्लड शुगर लेव्हल आणि इंसुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. झोप न लागल्यामुळे भूक वाढू शकते.
यासोबतच वजन वाढण्याचा धोकाही वाढतो. याव्यतिरिक्त, झोपेच्या कमतरतेमुळे कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी वाढते, जी रक्तातील साखरेच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नॅशनल स्लीप फाउंडेशनने शिफारस केली आहे की प्रौढांना प्रति रात्र किमान 7-8 तास उच्च-गुणवत्तेची झोप घ्यावी.
2. तणावमुक्त राहा (Stay Stress Free)
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या तणावाची पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, तणावामुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. खरं तर, जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचे शरीर ग्लुकागन आणि कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन्स सोडते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते.
3. पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा (Drink Water And Stay Hydrated)
पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवता येते. पाणी शरीरातील अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत करते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, नियमितपणे पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते आणि ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत होते.
4. वजन नियंत्रित करा (Control Weight)
योग्य वजनामुळे ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवता येते आणि मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनवर प्रकाशित झालेल्या लेखानुसार,
तुम्ही धावणे किंवा कोणतीही शारीरिक क्रिया किंवा खेळ खेळून वजन नियंत्रित करू शकता.
तुम्ही जिममध्ये घाम गाळलाच पाहिजे असे नाही.
5. धूम्रपान आणि मद्यपान टाळा (Avoid Smoking And Alcohol)
धूम्रपानाची सवय तुमची ब्लड शुगर वाढवू शकते. याशिवाय, तुम्हाला अनेक गंभीर आरोग्य समस्यांचाही धोका होऊ शकतो.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनमध्ये प्रकाशित लेखानुसार, निकोटीन तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढवते
आणि नंतर रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करणे कठीण होते.
मधुमेह असलेल्या लोकांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इन्सुलिनची आवश्यकता असते.
त्याचप्रमाणे मद्यपान हे देखील मधुमेही रुग्णाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes | diabetes just do these 5 things blood sugar will be controlled research claims
Diabetic | जर तुम्ही डायबिटिक असाल तर एकदा आवश्य ‘हे’ जाणून घ्या, व्हाल टेन्शन फ्री