आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे की जो नियंत्रणात न ठेवल्यास शरीराच्या अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (Bad Eating Habit) आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे (Deteriorating Lifestyle) भारतातील 7 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. साखर नियंत्रित (Diabetes Control) करण्यासाठी, स्वादुपिंडात दोन हार्मोन्स तयार होतात, इन्सुलिन आणि ग्लुकागन (Insulin And Glucagon). कमी इन्सुलिनमुळे ग्लुकोजची पातळी वाढू लागते, ज्यामुळे लोक मधुमेहाला बळी पडतात (Diabetes Control).
शरीरातील शुगर लेव्हल (Sugar Level) वाढली की इम्युनिटी (Immunity) कमकुवत होते. वाढत्या शुगरचा परिणाम हृदय, किडनी आणि मज्जासंस्थेवरही (Heart, Kidney And Nervous System) होतो. वाढत्या शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक आहारावर नियंत्रण ठेवतात तसेच औषधांचे सेवन करतात, तरीही ब्लड शुगरची पातळी (Blood Sugar Level) सामान्य नसते. तुम्हीही शुगरच्या आजाराचे बळी असाल तर योगा करा.
काही योगासने मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी आहेत, ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते आणि आवडीचा आहारही घेता येतो. बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्याकडून जाणून घेऊया शुगर नियंत्रित (Diabetes Control) करण्यासाठी कोणते योग प्रभावी आहेत.
1. सर्वांगासन (Sarvangasana) :
जे सर्वांगासन करतात, त्यांची दृष्टी चांगली राहते, तसेच काळ्या बुरशीसारख्या घातक आजारापासून संरक्षण होते. मधुमेही रुग्णांना हे आसन केल्याने फायदा होतो. हे योगासन केल्याने थायरॉईड ग्रंथी सुरळीतपणे काम करते.
हे आसन ग्लँड पचन, नर्व्हस रिप्रॉडक्टिव्ह सिस्टम, मेटाबॉलिज्म आणि रेस्पोरेटिव्ह सिस्टम योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी जबाबदार असते. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, हे आसन केल्याने मधुमेहाचे रुग्ण नॉन डायबेटिक (Non Diabetic) होतात.
2. मंडुकासन (Mandukasana) :
हे आसान मधुमेह नियंत्रित करते. हे आसन शुगर आणि पोटाच्या सर्व समस्यांवर सर्वोत्तम उपचार आहे.
मांडूकासनाचा योग्य सराव केल्याने स्वादुपिंडातून इन्सुलिन स्राव होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांना हे आसन केल्याने खूप फायदा होतो.
हे केल्याने एन्झाईम्स आणि हार्मोन्सचा स्राव व्यवस्थित सुरू होतो.
3. शशांकासन (Sasakasana) :
मधुमेह नियंत्रणात शशाकासन अत्यंत गुणकारी आहे. हे केल्याने स्वादुपिंडाच्या गतिशीलतेवर परिणाम होतो.
आणि मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. टाइप-1 आणि टाईप-2 मधुमेहावर (Type-1 And Type-2 Diabetes) नियंत्रण ठेवता येते.
हा योग केल्याने शुगरचे धोके टाळता येतात. शरीर लवचिक राहते आणि शरीरात चपळता येते.
तसेच वजनही नियंत्रणात राहते आणि तणावही दूर होतो.
Web Title :- Diabetes Control | effective yoga asan by swami ramdev for controlling blood sugar levels
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये ‘हे’ औषध, मुलांमध्ये वाढू शकतो ‘या’ गोष्टीचा धोका
Summer Diet Tips | उन्हाळ्यात आवश्य खा ‘हे’ 4 प्रकारचे मेलन, आरोग्य राहील चांगले !