आरोग्यनामा ऑनलाईन- अल्फाल्फा एक औषधी वनस्पती आहे. याची शेती जगभरातील अनेक देशात केली जाते. हे एकदा पेरल्यानंतर वर्षभर तयार होत राहाते. अरबी भाषेत यास पिकांचा पिता म्हटले जाते, कारण यामध्ये भरपूर पोषकतत्व आढळतात, जी आरोग्यासाठी खुप लाभदायक असतात. विशेष करून डायबिटीज(diabetes ) आणि लठ्ठपणामुळे त्रस्त लोकांसाठी हे रामबाण औषध आहे. आहारात अल्फाल्फा घेतल्यास वाढणारे वजन आणि डायबिटीज(diabetes ) दोन्हीमध्ये आराम मिळू शकतो. अल्फाल्फाचे फायदे जाणून घेवूयात…
मधुमेहात आराम मिळतो
डायबिटीजच्या रूग्णांसाठी अल्फाल्फा औषधाप्रमाणे आहे. याची पाने सेवन केल्याने स्वादुपिंडात इंसुलिन उत्सर्जित होऊ लागते. सोबतच रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात राहातो. यासाठी रोज सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा अल्फाल्फाच्या पानांची पावडर मिसळून सेवन करावी.
वजन कमी करते
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अल्फाल्फामध्ये कॅलरीची मात्रा खुपच कमी असते. फूड डाएट चार्टनुसार, 100 ग्रॅम अल्फाल्फामध्ये केवळ 23 कॅलरीज असतात. यामध्ये फायबर जास्त असते. याच्या सेवनाने भूक कमी लागते आणि पोट नेहमी भरल्यासारखे वाटते. यासोबतच डाएटमध्ये कमी कॅलरीज घेतल्याने वजन नियंत्रित होते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.