शुध्द तुपाचा ‘असा’ वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर फायदे

ghee

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केवळ वजनाची आणि हृदयविकाराची समस्या उद्भवू नये म्हणून अनेकांनी आपल्या आहारातून शुद्ध देशी तूपाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, या तूपाचे अनेक आरोग्यदायी  फायदे आहेत. देशी तुपामुळे मेंदू आणि शरीर तंदुरूस्त होते. डॉक्टरसुद्धा काही आजारात तुप खाण्याचा सल्ला देतात. देशी तुप खाल्ल्यामुळे कोणते फायदे होतात, हे पाहुयात.

देशी तुपाचे फायदे 

* हे पचण्यास एकदम हलके असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यासारखी अनेक पोषक तत्व असतात.

* सांधेदुखीचा त्रास कमी होतो. देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत. त्वचेमध्ये चमक येते.

* वात आणि पित्त शांत राहण्यास मदत होते.

* शुद्ध तुप खाण्याने पचन क्रिया उत्तम राहते.

* मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढतो. त्यासाठी शुद्ध तुप खावे.

* हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तुप लुब्रिकेंटचे काम करते.

* गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर आहे.

* उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पित्त वाढते ते कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे.

* डाळी शिजवतांना तुप टाकल्याने गॅस होत नाही.

* शुद्ध तुपाने मालिश केल्यास केस होत नाहीत पांढरे, जाणून घ्या इतर ९ फायदे

१) कोलेस्टेरॉल कमी होते.

२) नाडी प्रणाली तसेच मस्तिष्कासाठी लाभदायक आहे. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

३) शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट आणि मॉयश्चराइज होते.

४) स्किन नॉरिश करण्याबरोबर त्वचेतील शुष्कपणा कमी होतो. शुद्ध तुपाने चेहरा मसाज करणे उत्तम असते.

५) केस चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी डोक्याला शुद्ध तुपाने मालिश करावी. यामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.

६) भाजलेल्या अथवा शरीरावरील जखमेची खुण कमी करते.

७) ब्लड सेलमध्ये जमलेले कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करते. यामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते.

८) इम्यून सिस्टिम मजबूत होते.

९) शुद्ध तुपामध्ये सूक्ष्म जीवाणु, अ‍ॅन्टी-कँन्सर आणि अ‍ॅन्टी-व्हायरल एजेंट असल्याने अनेक आजारांशी लढा देण्यास मदत होते.

हे लक्षात ठेवा

* म्हशीच्या दुधापेक्षा गायीच्या दुधामध्ये वसाची मात्रा कमी असते. तुप घरी तयार करणे केव्हाही उत्तम. तुप बनवल्यानंतर ते लवकरात लवकर संपवावे.

* आरोग्य ठणठणीत असेल तर तुपाचे सेवन अवश्य करा. बटरपेक्षा तुप खाणे केव्हाही चांगले.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)