• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

मानसिक आजारांवर वेळीच उपचार करणे गरजेचे

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 20, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, माझं आराेग्य
0
dipration
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डिप्रेशन म्हणजे खिन्नता या मानसिक आजारामुळे मेंदूत वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम निर्माण होतात. या भ्रमांमुळे आजाराकडे कानाडोळा केला जातो. योग्य उपचार घेण्यातही उशीर केला जातो. यामुळे रुग्णाची प्रकृती जास्त बिघडत जाते. खिन्न व्यक्तीचा तणाव समुपदेशन, व्यायाम व ध्यानधारणेच्या साहाय्याने नियंत्रित करता येतो. तसेच परिस्थिती गंभीर असल्यास औषध घेण्याचा सल्लाही देण्यात येतो, परंतु अशा वेळी निराधार भ्रम उपचारात अडथळा निर्माण करतात,असे मानसोपचार तज्ज्ञ सांगातात.
मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती डिप्रेशनचे सावज होऊ शकते. तथापि, पुरुषांच्या तुलनेत डिप्रेशनची समस्या महिलांमध्ये जास्त आढळून येते. कारण महिला भावनात्मकदृष्ट्या अधिक कमकुवत असतात. तसेच एका संशोधनानुसार सध्याची जीवनशैली आणि स्पर्धेच्या युगात किशोरवयीन मुले-मुलीही डिप्रेशनचे सावज बनतात.

किशोरवयीन मुलांमध्ये वाद घालणे, कुणाचेही न ऐकणे आणि जास्त रागावणे इत्यादी सवयी असतात. या सवयी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या नकारात्मक बाजू आहेत. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीला डिप्रेस्ड म्हणता येणार नाही, परंतु जर मित्रांवर राग काढणे, आवडत्या कामात रस नसणे किंवा वारंवार मन:स्थिती बिघडत असेल तर ही डिप्रेशनची लक्षणे आहेत.डिप्रेस्ड लोक सहज रडतात, असा गैरसमज आहे. जे लवकर रडतात ते तणावग्रस्त आहेत आणि जे रडत नाहीत ते आनंदी आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. अनेक जण आपल्या समस्या किंवा चिंता स्वत:कडेच दडवून ठेवतात. यामुळे त्यांची प्रकृती जास्तच खालावते. डिप्रेशन हा एक प्रकारचा मानसिक आजार असून दीर्घ काळ अशी परिस्थिती राहिल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. डिप्रेस्ड लोकांच्या मेंदूत मज्जातंतूंपर्यंत विविध संदेश पोहोचवणारी रसायने व्यवस्थित काम करत नाहीत. अशा परिस्थितीत अनेक वेळा रुग्णाला औषध घेण्याचा सल्लाही देण्यात येतो.

मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक सहापैकी एक व्यक्ती डिप्रेशनने पीडित असते. लागोपाठ कामात व्यग्र राहिल्याने डिप्रेशन दूर होण्यास फायदा होत असल्याचा अनेकांचा भ्रम असतो. गरजेपेक्षा जास्त काम केल्याने किंवा ओव्हरटाइम केल्याने डिप्रेशन दूर होण्यापेक्षा परिस्थिती आणखी बिघडू शकते. ही शक्यता पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त असते. डिप्रेशनची समस्या आनुवांशिक असते याबाबत मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, कुटुंबातील कुणालाही डिप्रेशनची समस्या असल्यास त्यातील इतर सदस्यांना ती होईलच असे नाही. बोलल्याने डिप्रेशन आणखी वाढू शकते ही निराधार समजूत आहे. तणाव किंवा उदासीनता असल्यास जवळचे मित्र किंवा कुटुंबीयांसोबत चर्चा करायला हवी. त्यामुळे मनावरील ताण कमी होऊ शकतो. याउलट असे न केल्यास तणावग्रस्त व्यक्तीचा त्रास व समस्या वाढते. नकारात्मक विचार नियंत्रित करण्यासाठी आणि समस्येवर उपाय शोधण्यासाठी संबंधित व्यक्तीशी बोलणे आवश्यक ठरते. एका संशोधनानुसार आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आणि हृदयरोग वा एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यातून लवकर बरे होण्यामध्ये डिप्रेशन अडथळा आणू शकते.

Tags: arogyanamaBodyBrainBreakingDepressionexercisehealthMeditationआरोग्यआरोग्यनामाडिप्रेशनध्यानधारणेच्यामेंदूव्यायामशरीर
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021