आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Dengue Prevention | सध्या डेंग्यूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. पावसामुळे वातावरणात बदल होत असून बदलत्या मोसमात डासांचाही प्रादुर्भाव वाढू लागला आहे. देशभरात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जगात कीटकांमुळे होणार्या मृत्यूंच्या बाबतीत, डास आणि त्यांच्याद्वारे पसरणार्या रोगांमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. डास चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे अनेक आजार होतात. यापैकी सर्वात सामान्य डेंग्यू आहे. एडीस इजिप्ती नावाच्या मादी डासाच्या चावण्यामुळे होतो. (Dengue Prevention)
डेंग्यू का पसरतो?
पावसाळ्यात घाण नाल्यांमध्ये पाणी साचते आणि डासांची उत्पत्ती सुरू होते. यामुळे अनेक लोक आजारी पडतात. हे डास मुख्यतः दिवसा चावतात. डेंग्यू तापामध्ये हाडे आणि मांसपेशींमध्ये तीव्र वेदना होतात. शरीराची ताकद पूर्णपणे संपलेली वाटते. कोणताही रोग टाळण्याचा योग्य मार्ग म्हणजे रोग होण्यापूर्वी स्वतःचे संरक्षण करणे. या दिवसांत डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव होतो हे माहीत असताना, तो पसरण्याची वाट का पाहायची? डेंग्यू ताप टाळण्यास मदत करणारे कोणते मार्ग आहेत ते जाणून घेऊया. (Dengue Prevention)
डेंग्यू ताप टाळण्याचे उपाय
1. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी डासांना घरापासून दूर ठेवणे हा उत्तम उपाय आहे. यासाठी मॉस्किटो रिपेलंट वापरू शकता पण ज्यांना क्रीमची अॅलर्जी आहे ते नेट वापरू शकतात.
2. डासांना दूर ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचाही वापर करू शकता.
3. घरात संपूर्ण स्वच्छता ठेवा आणि पाण्यात सिट्रोनेला आणि लेमनग्रास अर्कचे काही थेंब मिसळून फरशी स्वच्छ करा.
4. पावसाचे पाणी घराभोवती साचू देऊ नका.
5. घराच्या छतावर ठेवलेल्या टाक्या बंद ठेवा.
6. घरातील बागेतील भांडी नियमितपणे स्वच्छ करा.
7. कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Dengue Prevention | ways to avoid dangerous disease like dengue breakbone fever dengue prevention tips aedes mosquito hemorrhagic
Male Fertility | ‘हे’ 4 फूड्स खाल्ल्याने वाढेल Sperm Count, पूर्ण होईल पिता बनण्याची इच्छा
High Uric Acid च्या रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 5 चूका, अन्यथा वाढू शकतो त्रास
Weight Loss Mistakes | जेवणात कधीही करू नका या चूका, अन्यथा वजन कमी करण्याची इच्छा राहील अपूर्ण