आरोग्यनामा ऑनलाईन- डेंग्यू तापाचा(Dengue Fever) सामना करण्यासाठी औषधांव्यतिरिक्त आहाराचीही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि आहारात काय टाळावे हे जाणून घेवूयात.
पपईच्या पानांचा रस
पपईच्या पानांचा रस डेंग्यूच्या तापात(Dengue Fever) सर्वाधिक वापरला जाणारा उपाय आहे. पपईच्या पानांचा रस डेंग्यू तापावर उपचार करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करतो. यामुळे प्लेटलेट्स वाढून रोग प्रतिकारशक्ती सुधारते.
हर्बल टी
हर्बल डीमध्ये भरपूर पोषक असतात. ती आरोग्यासाठीही चांगली आसतात. वेलची, आले आणि दालचिनी सुद्धा यात मिसळू शकता. हर्बल चहाची चव मनाला ताजेतवाने करते.
कडुनिंबाची पाने
कडुनिंबाची पाने औषधी गुणधर्मयुक्त असतात आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. कडुनिंबाचा रस विषाणूंची वाढ आणि प्रसार नियंत्रित करण्यात मदत करतो.
संत्रे
संत्र्यात आवश्यक पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. हे व्हिटॅमिन सीचे खजिना आहे. जे एक महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडेंट आहे. संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे अपचन होण्याचा धोका कमी होतो. डेंग्यूपासून लवकर आराम मिळवायचा असेल तर संत्रे नक्की खा.
खिचडी
चवदार धान्य किंवा दलिया हा जगभरातील लोकप्रिय नाश्ता आहे. खिचडीत फायबर आणि पोषक तत्व असल्याने रोगाशी लढण्याची शक्ती मिळते. ती गिळणे आणि पचन होण्यास सोपी आहे. डेंग्यूचा त्रास असताना खिचडी सेवन करा.
नारळ पाणी
डेंग्यूमुळे अनेकदा निर्जलीकरण होते. डेंग्यूच्या रुग्णांसाठी नारळपाणी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण ते पाण्याचे नैसर्गिक स्रोत असून यात आवश्यक खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स आहेत. त्याचे सेवन शरीरातील द्रव पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. अशा प्रकारे नारळपाणी डेंग्यूच्या रूग्णाच्या आहारामध्ये नक्कीच सामील करावे
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.