आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Dengue | देशातील अनेक भागात सध्या डेंग्यू (Dengue) चा कहर वाढत चालला आहे. या काळात मच्छरांपासून सतर्क राहिले पाहिजे. डेंग्यूची लक्षणे इतर हंगामी आजारांशी मिळती-जुळती असल्याने कोणत्याही मोठ्या समस्येपासून वाचण्यासाठी टेस्ट करणे आवश्यक आहे. डेंग्यूसाठी कोणत्या टेस्ट केल्या जातात (Which tests are done for dengue) ते जाणून घेवूयात…
डेंग्यूच्या टेस्टमध्ये डेंग्यू अँटीजन टेस्ट, सीबीसी, आयजीजी सारख्या काही टेस्टचा समावेश आहे. लक्षणांच्या आधारावर कोणती टेस्ट करायची हे डॉक्टर ठरवतात.
1. NS1
या टेस्टलाच डेंग्यू अँटीजेन टेस्ट म्हणतात. डेंग्यूची (Dengue)
लक्षणे समोर आल्यानंतर पाच दिवसांच्या आत ही टेस्ट करणे योग्य मानले जाते.
2. एलायजा
अँटीजनसह एलायजा टेस्टवर विश्वास केला हातो. यात सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला आयजीएम आणि दुसरा आयजीजी.
– आईजीएम टेस्ट डेंग्यूची लक्षणे आल्यानंतर 3-5 दिवसांच्या आत करावी.
– दुसरी टेस्ट आयजीजी सुद्धा 5 ते 10 दिवसांच्या आत करणे अनिवार्य आहे.
याशिवाय डॉक्टर रूग्णाला पाहून सुद्धा अनेक प्रकारची औषधे देतात. यासाठी कोणतेही लक्षण आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
–
डेंग्यूचा ताप आहे किंवा नाही हे कधी समजावे?
– डेंग्यूचा (Dengue) मच्छर चावल्यानंतर एक-दोन दिवसात तापाची लक्षणे दिसू लागतात.
– तापासह डोळे लाल होतात.
– रक्त कमी होऊ लागते.
– काही लोकांना चक्कर येऊ लागल्याने शुद्ध हरपते.
– तासासोबत अंगदुखी होते. सर्दी नसते.
लक्षणे दिसल्यास काय करावे
– प्लेटलेट्सची चाचणी करावी.
– मेडिकलमधून औषध आणून दोन-तीन दिवस वाट पाहू नका.
– ताप आल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
Web Title :- Dengue | dengue fever test know which test is used for detect dengue fever check here all details
Khajoor 10 Benefits In Winter | खजूरला वंडर फ्रूट का म्हणतात? जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 10 फायदे
Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या
Diabetes | दिवाळीत ‘डायबिटीज’च्या रूग्णांनी ‘या’ 7 गोष्टींकडे ठेवा लक्ष, अन्यथा वाढेल ब्लड शुगर
Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या