आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास, उपचार वेळेत झाल्याने रूग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. यामुळे कॅन्सरचे निदान लवकर होणे खूप महत्वाचे असते. यासाठी शासकीय पातळीवरही सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच कॅन्सरचे निदान किंवा उपचार खाजगी रूग्णालयांत घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राने महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचे निदान प्राथमिक टप्प्यात होऊन तातडीने उपचार सुरू करण्यासाठी आता उपक्रम सुरू केला आहे.
पुण्याच्या देहूमधील प्राथमिक आरोग्य केंद्राने पुढाकार घेऊन महिलांची ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कॅन्सरची विनामूल्य तपासणी केली. या तपासणीतून ज्या महिलांना कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यांना मोफत उपचार दिले. यामध्ये विविध संस्थांनी देखील सहभागी झाल्या होत्या. विविध संस्थांकडून या उपक्रमासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
कॅन्सरचे प्रमाण वाढत असून जर नियमितपणे तपासणी केली. तर कॅन्सरचे प्राथमिक टप्प्यात निदान करणे शक्य आहे. मात्र या कॅन्सरचे निदान करण्याच्या तपासण्या खूप महागड्या असल्याने त्या सर्वसामान्यांना परवडत नाहीत. याकरीता महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी उपक्रम राबवला असून यापुढे देखील असे उपक्रम राबवण्याचा आमचा विचार आहे, असे देहूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले.
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाचा कर्करोग सर्वाधिक दिसून येतो. या कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी खाजगी रूग्णालयांमध्ये जाणे परवडत नाही. यासाठी पुण्याच्या देहूमधील प्राथमिक आरोग्य केंद्राने पुढाकार घेऊन महिलांची कर्करोगाची विनामुल्य तपासणी करण्यात आली आहे.