पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – चित्रपट सृष्टीतील एक प्रिसद्ध अभिनेत्री असलेली दीपिका पादुकोण जी सध्या तिच्या अनेक चाहत्यांची फिटनेस आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. फिट राहण्यासाठी सध्या ती तासनतास जिममध्ये घालवते. दीपिकाच आवडतं व्यायाम पाइलेट्स आहे. ट्रेनर यास्मीन कराचीवालाने दीपिकाचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दीपिका पादुकोण परफेक्शनने कॅडिलॅक स्वॅनचा नवीन फंडा करताना दिसंत आहे.
पायलेट्स हा व्यायाम करताना तिने स्पोर्ट ब्रा आणि ब्लॅक कलरची योगा पॅन्ट घातली आहे. दीपिकाच वय सध्या ३३ वर्ष आहे. तरीही तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो अजून कमी झाला नाही. योगा करत असताना तिने कोणताही मेकअप केला नाही. तरीही हॉट आणि सेक्सी दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.
तिने आतापर्यन्त ८३ चित्रपट पूर्ण केले असून सध्या परत तिने तिचा आगामी चित्रपट छपाकच शुटटींग पूर्ण केलं आहे. छपाक’ या चित्रपटात दीपिका मालतीच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपासून तिच्या या चित्रपटातील लूकची बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. दीपिकासाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. ज्यामध्ये ती एका अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या एका तरुणीची भूमिका साकारली आहे.
लक्ष्मी अग्रवाल या अॅसिड हल्ला पीडितेच्या आयुष्यावर या चित्रपटाचं कथान बेतलेलं आहे. २००५ मध्ये लक्ष्मीवर अॅसिड हल्ला झाला होता. एका आव्हानात्मक भूमिकेला न्याय देणाऱ्या दीपिकानेही चित्रीकरण्याच्या अखेरच्या दिवशी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. माझ्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असं तिने लिहिलं आहे.